Join us

GST संकलनाने सरकारची तिजोरी भरली, आकडा 1.80 लाख कोटी रुपयांच्या पुढे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 20:49 IST

GST Collection : एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत एकूण जीएसटी संकलन 14.57 लाख कोटी रुपये झाले आहे.

GST Collection : आजपासून डिसेंबरची सुरुवात झाली असून, महिन्याच्या पहिल्याच दिवशी केंद्रातील मोदी सरकारला गुड न्यूज मिळाली आहे. भारताचे GST (वस्तू आणि सेवा कर) संकलन नोव्हेंबर 2024 मध्ये 8.5% ने वाढून 1.82 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. GST संकलन वाढणे म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेची ताकद आणि आर्थिक क्रियाकलापांमध्ये वाढ होत आहे. वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबरच्या या संकलनामुळे एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत एकूण जीएसटी संकलन 14.57 लाख कोटी रुपये झाले आहे.

ऑक्टोबरमध्येही विक्रमी संकलन झालेगेल्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर 2024 मध्येदेखील GST संकलनात 9% ची वाढ नोंदवली गेली होती. ऑक्टोबरचे एकूण संकलन 1.87 लाख कोटी रुपये होते, जे आतापर्यंतचे दुसरे सर्वात मोठे संकलन होते. 

ऑक्टोबर संकलनकेंद्रीय GST (CGST): ₹33,821 कोटीराज्य GST (SGST): ₹41,864 कोटीएकात्मिक GST (IGST): ₹99,111 कोटीसेस: ₹12,550 कोटी

जीएसटी संकलनात झालेली वाढ काय दर्शवते?वाढीव GST संकलनामुळे सरकारला विकासकामांमध्ये अधिक गुंतवणूक करण्याची संधी मिळते. यामुळे रस्ते, आरोग्य आणि शिक्षण यासारख्या मूलभूत सेवांमध्ये सुधारणा होण्यास मदत होऊ शकते. शिवाय, उच्च जीएसटी संकलन हे दर्शविते की अर्थव्यवस्थेत मागणी आणि वापर वाढत आहे. कंपन्यांच्या विक्री आणि सेवांच्या वाढीचाही हा पुरावा आहे. मात्र, जीएसटी संकलन वाढणे हे महागाई वाढण्याचेही लक्षण असू शकते. अनेकदा कंपन्या कराचा बोजा ग्राहकांवर टाकतात, ज्यामुळे किमती वाढतात.

टॅग्स :जीएसटीभारतअर्थव्यवस्था