Join us  

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका; मे महिन्यात GST संकलन २७ टक्क्यांनी घटले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2021 3:02 PM

GST: मागील सलग आठ महिने जीएसटी संकलन एक लाख कोटींवर गेले असले, तरी एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात त्यात २७ टक्के घट झाल्याची माहिती मिळाली आहे.

मुंबई: देशाला दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढल्याने देशातील अनेक भागांमध्ये लॉकडाऊन करण्यात आला होता. त्याचा परिणाम अर्थचक्र आणि जीएसटीवर संकलनावर झालेला पाहायला मिळत आहे. मागील सलग आठ महिने जीएसटी संकलन एक लाख कोटींवर गेले असले, तरी एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात त्यात २७ टक्के घट झाल्याची माहिती मिळाली आहे. (gst collection for May at rs 1 02 lakh crore 27 percent lower with earlier month)

मे महिन्यात जीएसटी वसुली १.०२ लाख कोटी रुपये झाली ती एप्रिल २०२१ च्या तुलनेत २७ टक्के कमी आहे. परंतु जेव्हा देशात पूर्ण टाळेबंदी होती तेव्हा म्हणजे मे २०२०च्या तुलनेत ६५ टक्के अधिक आहे. अर्थ मंत्रालयाकडून जीएसटी कर संकलनाची आकडेवारी जाहीर करण्यात आली. 

“PM मोदींची हिटलरशी तुलना चुकीची, तेव्हा जर्मनी एक आर्थिक महासत्ता बनला होता”

सलग ८ महिने १ लाख कोटींची वसुली

मे महिन्यात जीएसटीतून १,०२,७०९ कोटींचा महसूल मिळाला आहे. ज्यात सीजीएसटी १७ हजार ५९२ कोटी , एसजीएसटी २२ हजार ६५३ कोटी आणि आयजीएसटी ५३ हजार १९९ कोटी सरकारला प्राप्त झाले आहेत. त्याशिवाय विविध प्रकारचे अधिभार (सेस) मिळून सरकारला ९२६५ कोटींचा महसूल मिळाला आहे. मे २०२० च्या तुलनेत यंदा जीएसटी संकलनात ६५ टक्के वाढ झाली आहे. मे २०२१ मध्ये वस्तूंच्या आयातीतून मिळालेला महसूल ५६ टक्के अधिक आहे आणि देशांतर्गत व्यवहारांमधून मिळालेला (सेवा आयातीसह) महसूल मे २०२० पेक्षा ६९ टक्के अधिक आहे.

अदानींच्या ‘या’ कंपनीची कमाल; केवळ ५ दिवसांत शेअरमध्ये ३० टक्क्यांची वाढ

जीएसटी रिटर्न भरण्यासाठी मुदतवाढ

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे केंद्र सरकारने जीएसटी रिटर्न भरण्यासाठी मुदतवाढ दिली होती. त्यामुळे ४ जूनपर्यंतची आकडेवारी ग्राह्य धरण्यात आला असून, जीएसटी कर संकलनाचा तपशील जाहीर करण्यात आला आहे. लहान करदात्यांना जीएसटी रिटर्न सादर करण्यास उशीर झाल्यास त्यावर विलंब शुल्क आकारले जाणार नाही, असेही सरकारने जाहीर केले आहे. दरम्यान, कोरोना संकटामुळे अनेक राज्यांमध्ये कडक लॉकडाऊन लावण्यात आला होता. तरीही जीएसटी संकलन एक लाख कोटींवर राहील्याबाबत केंद्र सरकारने समाधान व्यक्त केले. 

टॅग्स :जीएसटीकेंद्र सरकारनिर्मला सीतारामनअर्थव्यवस्था