diesel demand : दिवसेंदिवस रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांची संख्या वाढतच चालली आहे. परिणामी इंधनाची मागणीही कायम जास्त असते. जगात सर्वात जास्त पेट्रोलडिझेल वापरणाऱ्या देशांमध्ये भारताचाही नंबर वरचा आहे. अशा परिस्थितीत समोर आलेली एक आकडेवारी आश्चर्यकारक आहे. ३१ मार्च रोजी संपलेल्या २०२४-२५ या आर्थिक वर्षात कोविड महामारीनंतर डिझेलच्या मागणीतील वाढ ही सर्वात कमी आहे. याचा अर्थ डिझेलच्या मागणीत घट होत असल्याचे दिसत आहे. मात्र, ही मागणी अचानक कमी होण्यामागे नेमकं काय कारण आहे? चला जाणून घेऊया. डिझेलच्या मागणीत घट का झाली?अहवालानुसार, ट्रक आणि कृषी यंत्रसामग्री चालविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डिझेलच्या मागणीतील वाढ २०२४-२५ मध्ये मंदावण्याचा अंदाज आहे, जो मागील आर्थिक वर्षात ४.३ टक्के आणि २०२२-२३ मध्ये १२.१ टक्के होता. आकडेवारीवरून असे दिसून येते की भारतात वापरल्या जाणाऱ्या इंधनात डिझेलचा वाटा सुमारे ४० टक्के आहे. भारतातील डिझेलची मागणी कमी होण्यास इलेक्ट्रिक वाहने (EVs) कारणीभूत आहेत. कारण, सरकार इलेक्ट्रिक वाहने घेण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. सध्या देशातील वाहतूक क्षेत्राच्या ३ चतुर्थांश भागाला अजूनही डिझेल ऊर्जा देते. पण, आता इलेक्ट्रिक वाहनांमुळे यात आणखी घट येण्याची शक्यता आहे.
सार्वजनिक वाहतुकीत इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराचा परिणामसार्वजनिक क्षेत्रातील वाहने आता वेगाने इलेक्ट्रिक वाहनांच्या रुपाने बदलली जात आहे. दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये इलेक्ट्रिक बसेसचा वापर वेगाने केला जात आहे. अनेक टियर-२ आणि टियर-३ शहरांमध्ये इलेक्ट्रिक ऑटो-रिक्षा (ई-रिक्षा) प्रमुख झाल्या आहेत. याचा परिणाम असा झाला आहे की शहरी सार्वजनिक वाहतुकीत डिझेलचा वापर थेट कमी होत आहे. तसेच, मोठ्या ई-कॉमर्स कंपन्या डिलिव्हरी वाहने म्हणून इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य देत आहेत. अशा बदलांचा परिणाम डिझेलवर चालणाऱ्या व्हॅन आणि हलक्या व्यावसायिक वाहनांवर होतो, ज्यामुळे लॉजिस्टिक्स क्षेत्रात मागणी कमी होते.
वाचा - सोने खरेदी करण्याचा प्लॅन करताय? एका तोळ्यामागे १.३० लाख रुपये तयार ठेवा; 'या' बँकेचा अंदाज
पेट्रोल आणि जेट इंधनाचा वापरपेट्रोलचा वापर ७.५ टक्क्यांनी वाढून ४ कोटी टन झाला, तर एलपीजीची मागणी ५.६ टक्क्यांनी वाढून ३ कोटी १३ लाख टन झाली. २०२४-२५ मध्ये जेट इंधनाचा वापर सुमारे ९ टक्क्यांनी वाढून ९ दशलक्ष टनांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. उद्योगांमध्ये इंधन म्हणून वापरल्या जाणाऱ्या नेफ्थाची मागणी ४.८ टक्क्यांनी कमी होऊन १३.१५ दशलक्ष टनांवर आली, तर इंधन तेलाचा वापर जवळजवळ एक टक्क्याने कमी होऊन ६.४५ दशलक्ष टनांवर आला.