मुंबई: सोन्याच्या दरांनी सध्या उच्चांक गाठला असून, याचा सर्वाधिक फायदा 'ग्रे मार्केट'मधील ऑपरेटर्सना होताना दिसत आहे. सध्या सोन्याच्या किमती ज्या वेगाने वाढत आहेत, त्या तुलनेत तस्करीच्या माध्यमातून मिळणारा नफाही प्रचंड वाढला आहे. मुंबईतील एका आघाडीच्या बुलियन डीलरने दिलेल्या माहितीनुसार, १ किलो सोन्याची तस्करी करून तस्कर आता ११.५ लाख रुपयांहून अधिक नफा कमावत आहेत.
आधी एक किलो सोने भारतात गैरमार्गाने आणले की त्यावर २.५ लाखांचा नफा मिळत होता. नंतर हा नफा ५ लाखांवर गेला होता. परंतू, गेल्या वर्षभरात सोन्याच्या दरात दुप्पटीहून जास्त वाढ झाली आणि तस्करांना होणारा नफा थेट ११-१२ लाखांवर गेला आहे. यामुळे सोन्यावरील घटविलेले सीमाशुल्क देखील कुचकामी ठरू लागले असून सोन्याच्या तस्करीत मोठी वाढ झाली आहे.
सोन्याचे दर जेव्हा कमी होते, तेव्हा सीमाशुल्क १२ टक्के होते. यामुळे तस्करी सोने भारतात आणून हे सीमाशुल्क वाचवत होते. परंतू, केंद्र सरकारने अर्थसंकल्पात ते ६ टक्क्यांवर आणले आणि तस्करीवर काही प्रमाणात आळा बसला. या सोन्यावर तीन टक्के जीएसटी देखील भरावा लागतो. आता सोन्याच्या किंमती वाढल्याने ही रक्कम मोठी झाली आहे. यामुळे तस्करांनी पुन्हा सोन्याची तस्करी सुरु केली असून एका किलोमागे ११.५ लाख रुपये नफा मिळवत आहेत.
सरकारच्या महसुलावर परिणाम:तस्करी वाढल्यामुळे सरकारला मिळणाऱ्या सीमा शुल्कात घट होत आहे. म्हणूनच, आगामी अर्थसंकल्प २०२६ मध्ये सोन्यावरील आयात शुल्क कमी करण्याची मागणी सराफा व्यापाऱ्यांनी केली आहे, जेणेकरून तस्करीला आळा बसेल आणि अधिकृत व्यापाराला चालना मिळेल.
Web Summary : Rising gold prices fuel smuggling, netting smugglers ₹11.5 lakh/kg. Reduced import duties proved ineffective. Jewelers request lowered import taxes in the upcoming budget to curb smuggling and boost legitimate trade, impacting government revenue.
Web Summary : सोने की बढ़ती कीमतों से तस्करी बढ़ रही है, तस्कर ₹11.5 लाख/किलो कमा रहे हैं। आयात शुल्क में कमी अप्रभावी साबित हुई। सराफा व्यापारी तस्करी रोकने और वैध व्यापार को बढ़ावा देने के लिए आगामी बजट में आयात कर कम करने का अनुरोध करते हैं, जिससे सरकारी राजस्व प्रभावित हो रहा है।