Join us

भारतात मोठी मंदी; तातडीच्या उपाययोजना करणे गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 06:10 IST

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी; मोठ्या जनादेशामुळे सुधारणांची संधी

वॉशिंग्टन : भारतात सध्या मोठी आर्थिक मंदी सुरू असून, त्याविरुद्ध सरकारने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे. नाणेनिधीने सोमवारी भारताशी संबंधित वार्षिक स्टाफ रिपोर्ट जारी केला.

नाणेनिधीच्या संचालकांनी सांगितले की, अलीकडील वर्षांत भारताने लक्षावधी लोकांना गरिबीच्या खाईतून बाहेर काढले आहे. तथापि, २0१९ च्या पहिल्या सहामाहीत भारताची आर्थिक वृद्धी मंदीत अडकली आहे. या मंदीला अनेक घटक कारणीभूत आहेत.नाणेनिधीच्या आशिया आणि प्रशांत विभागाचे मोहीम प्रमुख राणील सालगादो यांनी सांगितले की, भारतातील सध्याची समस्या आर्थिक मंदी हीच आहे. आम्हाला अजूनही वाटते की, बहुतांश मंदी संरचनात्मक नसून आर्थिक चक्राचा भाग असावी. मंदीचा विळखा लवकरच सुटेल, असे आम्हाला आधी वाटत होते. तथापि, वित्तीय क्षेत्रातील काही समस्यांमुळे ते आता शक्य दिसत नाही.कर्जवितरणातील अडथळे कारणीभूतहा स्टाफ रिपोर्ट आॅगस्टमध्ये तयार करण्यात आला होता. तेव्हा भारतातील आर्थिक मंदीची संपूर्ण कल्पना नाणेनिधीला नव्हती. सालगादो म्हणाले की, भारत आता मंदीच्या पूर्णत: विळख्यात आहे. बिगर-बँक वित्तीय संस्थांच्या कर्ज विस्तारात आलेला अडथळा, कर्ज स्थितीवरील व्यापक ताण आणि प्रामुख्याने ग्रामीण भागातील कमजोर उत्पन्न वृद्धी ही मंदीमागील प्रमुख कारणे आहेत.

टॅग्स :निर्मला सीतारामनभारतअर्थव्यवस्था