Join us

मुंबई शेअर बाजारात दशकातील चांगला दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 01:45 IST

मुंबई शेअर बाजारात बुधवारी संवेदनशील निर्देशांक १८६१.७५ अंश म्हणजेच ६.९८ टक्क्याने वाढून २८५३५.७८ अंशावर बंद झाला. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या निफ्टीमध्येही ६.६२ टक्क्यांनी वाढ झाली. हा निर्देशांक ५१६.८० अंशांनी वाढून ८३१७.८५ अंशावर बंदझाला.

मुंबई : अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारने योजलेल्या उपायांना शेअर बाजाराने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्याचबरोबर अमेरिकेतील उपाययोजनांमुळे जगभरातील शेअर बाजार वाढले होते. यामुळे मुंबई शेअर बाजारात निर्देशांकामध्ये गेल्या दशकातील एका दिवसातील सर्वाधिक वाढ नोंदविण्यात आली.मुंबई शेअर बाजारात बुधवारी संवेदनशील निर्देशांक १८६१.७५ अंश म्हणजेच ६.९८ टक्क्याने वाढून २८५३५.७८ अंशावर बंद झाला. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या निफ्टीमध्येही ६.६२ टक्क्यांनी वाढ झाली. हा निर्देशांक ५१६.८० अंशांनी वाढून ८३१७.८५ अंशावर बंदझाला. एका दिवसात निर्देशांकाने नोंदविलेली ही सर्वाधिक वाढ ठरली आहे. गेल्या दशकातील एका दिवसात झालेली ही सर्वात मोठी वाढ होय. अर्थव्यवस्थेला गती मिळावी यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी काही सवलती जाहीर केल्या त्याचप्रमाणे अमेरिकेच्या सिनेट व व्हाइट हाउसने अमेरिकन अर्थव्यवस्थेसाठी दोन ट्रिलीयन डॉलरचे पॅकेज जाहीर केले. यामुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये सकारात्मक वातावरण होते.

टॅग्स :शेअर बाजार