Join us

झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 18:59 IST

गेल्या काही काळात अनेकदा युपीआय सिस्टीम बंद पडली होती. यामुळे हा ताण कमी करण्यासाठी काही गोष्टींवर लिमिट लावले जाणार आहे.

गुगलपे, फोनपे सह अन्य युपीआय पेमेंट अ‍ॅप्सवर आता बंधणे येणार आहेत. युपीआयवरून पैशांची देवाणघेवाण करणाऱ्या करोडो लोकांसाठी महत्वाची बातमी आहे. युपीआय पेमेंट सिस्टीमवर प्रचंड लोड येत असल्याने एनपीसीआय आता बॅलन्स चेक करण्यापासून वेगवेगळ्या वापरावर बंधने आणणार आहे. येत्या १ ऑगस्टपासून हे नवे नियम लागू होण्याची शक्यता आहे. 

गेल्या काही काळात अनेकदा युपीआय सिस्टीम बंद पडली होती. यामुळे हा ताण कमी करण्यासाठी काही गोष्टींवर लिमिट लावले जाणार आहे. फायनान्शिअल एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार ऑटो पेमेंट जर सेटे केले असेल तर त्यातही बदल केले जाणार आहेत. युपीआयवरून दर महिन्याला सुमारे १६ अब्ज एवढे प्रचंड प्रमाणावर व्यवहार केले जात आहेत. व्यवहारांमुळे UPI प्रणालीवरील भार वाढत आहे. बँकांकडूनही या प्रणालीचा चुकीचा वापर होत असल्याचे समोर आले आहे. 

काही तांत्रिक अडचणी असल्याने १ ऑगस्टपासून काही नियम बदलले जाणार असून लिमिटेशन आणली जाणार आहेत. १२ एप्रिलला युपीआयची प्रणाली बदलल्यानंतर पाच ते सहा तास युपीआय सिस्टीम बंद पडली होती. असाच प्रकार या महिनाभरात दोन ते तीनदा झाला होता. तीन वर्षांतील हा सर्वात मोठा आऊटेज होता. युपीआयने लोकांच्या आयुष्यात मोठा बदल केला आहे. लोक खिशात पैसे ठेवत नाहीत, यामुळे जर युपीआय बंद पडले तर त्या लोकांना त्रासाला सामोरे जावे लागते. मिनिटभर जरी युपीआय बंद पडले तरी चार लाख लोकांना त्रास होतो. सध्या युपीआयवर ४० कोटी लोक व्यवहार करत आहेत. वारंवार येणाऱ्या API विनंत्यांमुळे युपीआयवर ताण वाढत आहे. यातही 'चेक ट्रान्झॅक्शन'जास्त आहेत. एप्रिलमध्ये 'चेक ट्रान्झॅक्शन' सर्वाधिक केले गेले, यामुळे युपीआय प्रणाली बंद पडली होती.  

1 ऑगस्टपासून लोक आता दिवसातून ५० वेळा बॅलन्स तपासू शकणार आहेत. मोबाईल नंबरशी लिंक केलेल्या खात्यांची संख्या देखील दिवसातून २५ वेळापेक्षा जास्त पाहता येणार नाही. तसेच SIP किंवा Netflix चे ऑटो पेमेंट ताण नसलेल्या वेळेत केले जाणार आहे. नॉन-पीक अवर्स म्हणजे सकाळी १० वाजण्यापूर्वी, दुपारी १ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आणि रात्री ९:३० नंतरचा कालावधी आहे.

टॅग्स :गुगल पेपैसा