Join us

सिगरेटवर ४० टक्के GST लावण्याच्या तयारीत सरकार; तंबाखू कंपन्यांचे शेअर्स गडगडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 12:42 IST

GST Increase On Cigarette: सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांवरील जीएसटी वाढवला जाण्याची शक्यता आहे. तंबाखूजन्य पदार्थांवरील कम्पन्सेशन सेस हटवल्यानंतर आता हे पाऊल उचललं जाऊ शकतं.

GST Increase On Cigarette: सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांवरील जीएसटी वाढवला जाण्याची शक्यता आहे. तंबाखूजन्य पदार्थांवरील कम्पन्सेशन सेस हटवल्यानंतर आता हे पाऊल उचललं जाऊ शकतं. सध्या भारतात सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांवर २८ टक्के जीएसटी, कम्पेनसेशन सेस आणि इतर कर आकारले जातात. यामुळे तंबाखूजन्य पदार्थांवरील एकूण अप्रत्यक्ष कराचा बोजा ५३ टक्क्यांवर आला आहे. तंबाखूजन्य पदार्थांवरील जीएसटी जास्तीत जास्त ४० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा आणि स्वतंत्र उत्पादन शुल्क आकारण्याचा प्रस्ताव विशेष चर्चेद्वारे ठेवण्यात आलाय.

Sin Goods च्या श्रेणीत येतात तंबाखू प्रोडक्ट

३१ मार्च २०२६ रोजी कम्पेनसेशन संपणार आहे. अशातच तंबाखूजन्य पदार्थांपासून मिळणारं उत्पन्न कायम ठेवण्यासाठी ४० टक्के जीएसटी नसूल करण्याचा विचार केला जात आहे. परंतु जीएसटी काऊन्सिलच यावर अंतिम निर्णय घेऊ शकतं. तंबाखूजन्य उत्पादनांना 'Sin Goods' या कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आलंय. यावर अनेक प्रकारचे कर वसूल केले जातात. यामध्ये जीएसटीशिवाय एक्साइज ड्युटी, कम्पेनसेशन सेस, एनसीसीडी यांचा समावेश आहे.

मिळतो हजारो कोटींचा महसूल

तंबाखूजन्य पदार्थांपासून भारत सरकारला दरवर्षी हजारो कोटी रुपयांचा महसूल मिळतो. २०२२-२३ या आर्थिक वर्षात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीतून सरकारला एकूण ७२ हजार ७८८ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. तंबाखूजन्य पदार्थांमध्ये सिगारेटव्यतिरिक्त पान मसाला इत्यादींचा समावेश होतो. या बातमीनंतर गुरुवारी तंबाखू कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. कामकाजादरम्यान प्रमुख तंबाखू कंपनी आयटीसीचे शेअर्स जवळपास २ टक्क्यांनी तर ग्रॉड्रफ्रे फिलिप्सचे शेअर्स ५ टक्क्यांहून अधिक घसरले होते.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारजीएसटीसरकार