Join us

२८ कोटी युझर्स, ९६०० कोटींचा महसूल; Dream 11 चा 'गेम' झाला, गेमिंग विधेयकानंतर बंद करण्याची तयारी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 12:48 IST

Dream 11 to Shut Down: सरकारचं ऑनलाइन गेमिंग विधेयक (Online Gaming Bill 2025) लोकसभेनंतर राज्यसभेत मंजूर झालं. या विधेयकामुळे ऑनलाइन गेमिंग उद्योगात खळबळ उडाली आहे.

Dream 11 to Shut Down: सरकारचं ऑनलाइन गेमिंग विधेयक (Online Gaming Bill 2025) लोकसभेनंतर राज्यसभेत मंजूर झालं. या विधेयकामुळे ऑनलाइन गेमिंग उद्योगात खळबळ उडाली आहे आणि विशेषतः रिअल मनी गेम्स (Real Money Games) व्यवसायाशी संबंधित कंपन्यांचे धाबे दणाणलेत. या क्षेत्रातील दिग्गज कंपनी ड्रीम११ नं (Dream 11) आपला व्यवसाय आटोपता घेण्याची तयारी केली आहे, यावरुनच याचा अंदाज लावता येऊ शकतो.

Dream11 चा कोट्यवधी युजर्सना झटका

ऑनलाइन गेमिंग विधेयकाला सभागृहानं मंजुरी दिल्यानंतर, ऑनलाइन गेमिंग दिग्गज ड्रीम११ ने घाईघाईनं त्यांचं रिअल-मनी गेमिंग युनिट बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आलीये. बिझनेस टुडेला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सरकारच्या नवीन गेमिंग विधेयकात कायदेशीर आधारावर पेड ऑनलाइन गेमवर बंदी असल्यानं ड्रीम११ त्यांचा रिअल मनी गेमिंग व्यवसाय बंद करत आहे. ड्रीम११ प्लॅटफॉर्मवर २८ कोटींहून अधिक रजिस्टर्ड युजर्ससाठी हा मोठा धक्का आहे.

"हा ट्रम्प यांच्या नोबेल पुरस्कार जिंकण्याच्या प्रयत्नाचा एक भाग," अमेरिकेच्या माजी NSA नं भारतावरील टॅरिफवरुन केली जोरदार टीका

"आता कोणताही मार्ग नाही..."

फॅन्टसी गेमिंग कंपनी ड्रीम११ ची सुरुवात २००८ मध्ये झाली. हर्ष जैन आणि भावित शेठ हे या कंपनीचे संस्थापक आहेत. या प्लॅटफॉर्मची वाढती लोकप्रियता आणि २८ कोटींहून अधिक युजर्सच्या संख्येमुळे ते भारतातील अव्वल फॅन्टसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म बनलं आहे. जर आपण कमाईबद्दल बोललो तर, केवळ आर्थिक वर्ष २४ मध्येच त्यांनी सुमारे ९,६०० कोटी रुपयांची कमाई केली आणि रिपोर्टनुसार, सुमारे ९०% महसूल ड्रीम११ च्या रिअल-मनी कॉन्टेस्टमधून येतो. क्रिकेटशी संबंधित खेळांनी यात मोठा वाटा उचलला आहे.

ड्रीम स्पोर्ट्सचे सीईओ हर्ष जैन यांनी एका अंतर्गत नोटमध्ये प्लॅटफॉर्मच्या रिअल मनी गेम्स युनिटच्या कर्मचाऱ्यांना, नवीन कायदा लागू झाल्यानंतर ड्रीम११ चे पेड गेम्स सुरू ठेवण्याचा कोणताही मार्ग उरला नसल्याचं सांगितलंय. कंपनीनं त्यांच्या सर्व कायमस्वरूपी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना बदलांबद्दल स्पष्टपणं माहिती दिल्याचंही सूत्रांनी बिझनेस टुडेला सांगितलं.

वेगानं वाढलं मूल्यांकन

ड्रीम११ लाँच झाल्यापासून त्यांचा व्यवसाय वेगानं वाढला आणि २०२१ पर्यंत त्याचं मूल्यांकन ८ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचलं. या प्लॅटफॉर्मला टायगर ग्लोबल, क्रिसकॅपिटल, मल्टीपल्स आणि टीसीव्ही यांचाही पाठिंबा आहे. दरम्यान, रिअल गेम्स युनिट बंद करण्याबाबत कंपनीकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आणि ड्रीम११ अॅप सध्या कार्यरत असल्याचंही कंपनीचं म्हणणं आहे.

टॅग्स :सरकारपैसाकेंद्र सरकार