Join us

चीनच्या App वर सरकारने 2020 मध्ये घातलेली बंदी; आता मुकेश अंबानी यांनी पुन्हा केले लॉन्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 18:43 IST

उद्योगपती मुकेश अंबानी यांनी चायजीन अॅप भारतात रिलॉन्च केले आहे.

Mukesh Ambani : भारत आणि चीनचे संबंध आता हळुहळू सुधारत आहेत. पण, 2020 मध्ये गलवान खोऱ्यातील घटनेनंतर दोन्ही देशातील तणाव प्रचंड वाढला होता. त्या घटनेत 20 जवान शहीद झाले होते. त्या घटनेनंतर भारताने 50 हून अधिक चिनी ॲप्सवर बंदी घातली होती. यामध्ये TikTok आणि Shein, या फॅशन ॲपचाही समावेश होता. पण, आता हे फॅशन ॲप 5 वर्षांनी भारतात परतले आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स रिटेलने अॅप देशात पुन्हा लॉन्च केले आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी असलेल्या रिलायन्स रिटेलने पाच वर्षांपूर्वी परवाना करारांतर्गत Sheinचे समर्पित ॲप लॉन्च केले होते. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, हे ॲप शनिवारी कोणत्याही गाजावाजा किंवा अधिकृत घोषणा न करता भारतात पुन्हा लॉन्च करण्यात आले आहे. गेल्या वर्षीच रिलायन्सने भारतात Shein ॲप पुन्हा लॉन्च करण्यासाठी भागीदारी केली होती. काही काळापूर्वी रिलायन्स रिटेलने आपल्या फॅशन ब्रँड Ajio च्या ॲपवर Sheinची चाचणी केली होती. आता Shein ब्रँड जवळपास 5 वर्षांच्या बंदीनंतर भारतात परतला आहे.

Tata आणि Mitra शी स्पर्धा भारतात अतिशय वेगाने ई-कॉमर्स फॅशन क्षेत्र लोकप्रिय होत आहे. टाटा समूहाच्या Zudio ब्रँडने या विभागात झपाट्याने यश मिळवले आहे. तर Flipkart चे Myntra ॲपदेखील या विभागातील सर्वात मोठे ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे. याशिवाय, Snitch सारखे नवीन स्टार्टअपदेखील वेगाने वाढत आहेत. अशा परिस्थितीत रिलायन्स रिटेललाही Shein च्या बळावर या सेगमेंटमध्ये आपली पकड मजबूत करायची आहे.

रेडसीर स्ट्रॅटेजी कन्सल्टंटच्या अहवालानुसार, 2030-31 पर्यंत भारताचा वेगवान फॅशन बाजार $50 अब्ज इतका असेल. भारताच्या एकूण फॅशन रिटेल मार्केटमध्ये फास्ट फॅशनचा वाटा सुमारे 25 ते 30 टक्के असेल.

2012 मध्ये Shein ची सुरुवात शीन ब्रँडची सुरुवात 2012 मध्ये चीनमध्ये झाली होती. नंतर त्याचे मुख्यालय सिंगापूरला हलवण्यात आले. हा ब्रँड अतिशय कमी किमतीत वेस्टर्न कपडे देतो. रॉयटर्सच्या बातमीनुसार, गेल्या वर्षी सरकारने संसदेत माहिती दिली होती की, रिलायन्सने Shein ब्रँडसोबत करार केला आहे, ज्यामध्ये भारतीय विक्रेते Shein ब्रँडला उत्पादने पुरवतील. याशिवाय इतर कोणतीही माहिती सार्वजनिक करण्यात आली नव्हती. आता हे अॅप अधिकृतपणे लॉन्च झाले आहे.

टॅग्स :मुकेश अंबानीरिलायन्सचीनव्यवसाय