Google Laid Off Employees : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे जगभरात अनिश्चितेचं वातावरण निर्माण झालं आहे. ट्रम्प यांनी टॅरिफ लागू केल्यानंतर बहुतेक देशांचे शेअर बाजार गडगडले. सध्यातरी ट्रम्प यांनी ३ महिन्यांसाठी आयात शुल्काला स्थगिती दिली आहे. मात्र, ट्रम्प यांच्या आक्रमक धोरणामुळे जगावर मंदीचे सावट निर्माण झाले आहे. याचे परिणामही आता समोर येऊ लागले आहे. टेक जायंट अल्फाबेटची मूळ कंपनी असलेल्या गुगलने आपल्या शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.
गुगलकडून या विभागात कर्मचारी कपातटेक जायंट अल्फाबेटची मूळ कंपनी असलेल्या गुगलने आपल्या शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. हे सर्व कर्मचारी अँड्रॉइड सॉफ्टवेअर, पिक्सल फोन आणि क्रोम ब्राउझरवर काम करत होते. सूत्रांचा हवाला देऊन रॉयटर्सने ही माहिती दिली आहे. सीएनबीसीच्या अहवालानुसार, सुमारे २५,००० कर्मचारी अँड्रॉइड, क्रोम, क्रोमओएस, गुगल फोटोज, गुगल वन, पिक्सेल, फिटबिट आणि नेस्टवर काम करत आहेत.
गुगलमध्ये नोकर कपात का होतेय?अमेरिकन माध्यमांनी वृत्त दिले होते की २०२५ च्या सुरुवातीला गुगलने त्यांच्या कर्मचाऱ्यांना टारगेट करत एक स्वैच्छिक एक्झिट प्रोग्राम सुरू केला होता. २०२४ मध्ये, वरिष्ठ उपाध्यक्ष रिक ऑस्टरलोह यांच्या नेतृत्वाखाली गुगलचे अँड्रॉइड आणि हार्डवेअर विलीन करण्यात आले, जेणेकरून उत्पादनांमध्ये एआय वैशिष्ट्ये एकत्रित करता येतील आणि संपूर्ण कंपनीचे कामकाज सुव्यवस्थित करता येईल.
वाचा - ट्रम्प टॅरिफनंतर चीनचं 'या' क्षेत्रात वर्चस्व कायम! अमेरिकचं तर नावही नाही, भारताचा नंबर घसरला
यापूर्वी, सीएनबीसीने वृत्त दिले होते की अंतर्गत बदलांमुळे, गुगल पीपल ऑपरेशन्स आणि क्लाउड विभागातून आपल्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा विचार करत आहे. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, गुगलची मूळ कंपनी अल्फाबेट इंकमध्ये सुमारे १,८३,३२३ कर्मचारी काम करत होते. जे मागील वर्षाच्या तुलनेत ८२१ (०.४५%) ने वाढले होते.