Join us
Daily Top 2Weekly Top 5

खूशखबर! SBIनं फिक्स्ड डिपॉझिटवरचे व्याजदर वाढवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 17:03 IST

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया(SBI)नं फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदर वाढवले आहेत.

नवी दिल्ली- भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया(SBI)नं फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदर वाढवले आहेत. त्यामुळे याचा फिक्स्ड डिपॉझिट(ठेवीं)मध्ये ठेवलेले पैसे जलदरीत्या वाढणार आहेत. बँकेचे हे नवे व्याजदर तात्काळ लागू झाले आहेत. बँकांनी या व्याजदरात 5 ते 10 बेसिस पॉइंटची वाढ होणार आहे. एसबीआयनं भारतीय रिझर्व्ह बँके(आरबीआय)ची पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीआधीच हा निर्णय घेतला आहे. आता एक वर्षाहून अधिक काळासाठी तुम्ही ठेवी ठेवल्यास तुम्हाला त्या पैशांवर 6.8 टक्के व्याज मिळणार आहे. तर तीन वर्षांसाठी ठेवलेल्या रकमेवरही तुम्हाला 6.80 टक्के दरानं व्याज मिळणार आहे. पहिल्यांदा हा दर 6.75 टक्के एवढा होता.सर्व बँका वाढवतायत व्याजदर या वर्षी देशातील सर्व प्रमुख बँका एफडीवर मिळणाऱ्या व्याजदरात वाढ करत आहेत. एचडीएफसी, एक्सिस, पीएनबी, बँक ऑफ बडोदा, इंडसइंड बँक या बँकांही व्याजदर वाढवतायत.

टॅग्स :एसबीआयस्टेट बँक आॅफ इंडिया