Join us
Daily Top 2Weekly Top 5

खूशखबर! सोन्या-चांदीच्या दरात घसरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 18:24 IST

सोने-चांदी खरेदी करणा-यांसाठी एक खूशखबर आहे. गेल्या चार दिवसात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याला दरात 600 ते 800 रुपयांची घसरण झाली आहे. तर, चांदीच्या दरातही प्रतिकिलो 620 रुपयांची घट झाली आहे. 

मुंबई : सोने-चांदी खरेदी करणा-यांसाठी एक खूशखबर आहे. गेल्या चार दिवसात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याला दरात 600 ते 800 रुपयांची घसरण झाली आहे. तर, चांदीच्या दरातही प्रतिकिलो 620 रुपयांची घट झाली आहे. 

सराफा बाजारात सुमारे पाच महिन्यांनंतर सोन्या-चांदीचे दर कमी झाले आहेत. आज (18 जुलै) सोन्याचा दर प्रति तोळा 30 हजार 500 रुपयांवर पोहोचला आहे. तर, चांदीचा दर प्रतिकिलो 39 हजार 200 रुपयांचा आहे. दरम्यान, याआधी गेल्या फेब्रवारी महिन्यात सोन्याचा भाव 31 हजार रुपयांच्या वर गेला होता. 

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरांमध्ये झालेली घसरण आणि स्थानिक सराफांकडून कमी झालेली मागणी यामुळे सोन्या-चांदीचे दर कमी झाल्याचे समजते.  

टॅग्स :सोनंव्यवसाय