नवी दिल्ली : लग्नसराईपूर्वीच सोन्या चांदीच्या दरात सातत्याने घसरण होताना दिसत आहे. खरे तर, हा सर्वसामान्यांसाठी दिलासाच म्हणावा लागेल. नोव्हेंबरमध्ये ज्यांच्या घरी विवाह समारंभ असतील आणि ज्यांनी अजून दागिने खरेदी केलेले नाहीत, त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी आहे.
आज, भाऊबीजेच्या दिवशीही, सोन्या-चांदीच्या दरात काहीसा कमी झाला. चांदीच्या दरात ₹१३०१ रुपयांची मोठी घट झाली आहे. तर, सोन्याचा भावातही ₹८० रुपयांनी किरकोळ कमी झाला आहे. आता जीएसटीसह २४ कॅरेट सोन्याचा भाव ₹१,२७,५४१ प्रति १० ग्रॅम झाला आहे, तर चांदी जीएसटीसह ₹१,५५,७३६ प्रति किलोवर आली आहे.
आइबीजेएनुसार, २३ ऑक्टोबरला २४ कॅरेट सोन्याचा दर जीएसटी वगळता ₹१२३९०७ वर बंद झाला होता, तर चांदी जीएसटी वगळता ₹१५२५०१ प्रति किलोवर बंद झाली होती. आज, २४ कॅरेट सोने जीएसटी वगळता ₹१२३८२७ प्रति १० ग्रॅमने खुली झाली, तर चांदी ₹१५१२०० प्रति किलोने खुली झाली.
जाणून घ्या २३,२२,१८ कॅरेटचा भाव - २३ कॅरेट सोन्याचा विचार करता, हे देखील ₹८० रुपयांनी स्वस्त होऊन ₹१२३३३१ प्रति १० ग्रॅमने उघडले, जे आता जीएसटीसह ₹१२७०३० झाले आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर ₹७३ रुपयांनी कमी होऊन ₹११३४२६ प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे, जो जीएसटीसह ₹११६८२८ आहे. तर, १८ कॅरेट सोनेही ₹७३ रुपयांच्या घसरणीसह ₹९२८७० प्रति १० ग्रॅमवर आले असून ते जीएसटीसह ₹९५६५६ वर आले आहे.
यावर्षी सोन्याचा भाव ₹४८०८७ तर चांदी ₹६५१८३ ने वधारली -गेल्या काही दिवसांतील तेजीनंतर आता दर काहीसे खाली आले असले तरी, ऑक्टोबर महिन्यात सोने ₹८,४७८ प्रति १० ग्रॅमने महागले होते, तर चांदी ₹८७६६ प्रति किलोने वधारली होती. यावर्षी सोन्याचा भाव ₹४८०८७ प्रति १० ग्रॅमने, तर चांदी ₹६५१८३ प्रति किलोने वधारली आहे.
Web Summary : Gold and silver prices are declining before the wedding season, offering relief to consumers. Silver decreased by ₹1301, gold by ₹80. The rates for 22, 23, and 24-carat gold have also decreased.
Web Summary : शादी के सीजन से पहले सोना और चांदी की कीमतों में गिरावट, उपभोक्ताओं को राहत। चांदी ₹1301 और सोना ₹80 सस्ता हुआ। 22, 23 और 24 कैरेट सोने की दरें भी घटीं।