Join us

भारतानंतर आता परदेशातही Paytm द्वारे UPI Payment करता येणार; फक्त एक काम करावं लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 15:47 IST

UPI Payment : पेटीएमची मालकी असलेली कंपनी ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडने (ओसीएल) काही निवडक देशांमध्ये पेटीएम वापरकर्त्यांसाठी UPI पेमेंटची सुविधा सुरू केली आहे.

UPI Payment : देशात युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) सुरू झाल्यापासून आर्थिक व्यवहार सुलभ झाले आहेत. भाजीच्या जुडीपासून दागिन्यांच्या पेमेंटपर्यंत सर्व आर्थिक व्यवहार आता यूपीआयद्वारे केले जात आहेत. दरम्यान, UPI विस्तारासाठी भारत सरकार सातत्याने नवनवीन निर्णय घेत आहे. भारताच्या पुढाकाराने नेपाळ, फ्रान्स, यूएई, मलेशिया, सिंगापूर, फिलिपाइन्स, श्रीलंका, मॉरिशस, भूतान, ओमान आणि मालदीव अशा अनेक देशांमध्ये UPI पेमेंट सुविधा सुरू करण्यात आली आहे. आता थर्ड पार्टी अ‍ॅप पेटीएमने देखील आंतरराष्ट्रीय UPI पेमेंटची सुविधा सुरू केली आहे.

निवडक देशांमध्ये मिळणार सुविधापेटीएमची मालकी असलेली कंपनी ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडने (ओसीएल) काही निवडक देशांमध्ये पेटीएम वापरकर्त्यांसाठी UPI पेमेंटची सुविधा सुरू केली आहे. अशा परिस्थितीत आता भारतीय प्रवासी पेटीएम अ‍ॅपद्वारे कोणत्याही अडचणीशिवाय कॅशलेस पेमेंट करू शकणार आहेत. पेटीएमचे प्रवक्ते म्हणाले, "यूपीआय इंटरनॅशनलसह, भारतीय प्रवाशांना ही सुविधा प्रदान करताना आम्हाला आनंद होत आहे. यापुढे यूएई, सिंगापूर, फ्रान्स, मॉरिशस, भूतान आणि नेपाळ सारख्या देशांमध्ये सुरक्षित, कॅशलेस पेमेंट करू शकतील.

वनटाइम अ‍ॅक्टिवेशन आवश्यकपरदेशात पेटीएमद्वारे UPI सुविधेचा वापर करण्यासाठी, वापरकर्त्यांना त्यांच्या बँक खात्याशी लिंक केलेले एक वेळ सक्रिय करणे आवश्यक आहे. यात १ ते ९० दिवसांपर्यंत वापर कालावधी कस्टमाइझ करण्याचा पर्याय आहे. ही प्रक्रिया अतिरिक्त सुरक्षेसाठी आहे. गरज नसताना हे निष्क्रिय करता येते.

पेटीएमकडून नवीन फीचर लाँचपेमेंट करताना युजर्स रिअल-टाइम परकीय चलन दर पाहू शकणार आहेत. त्यांच्या बँकेद्वारे पारदर्शकतेसह लागू केलेल्या इतर सुविधा शुल्क आणि खर्च नियंत्रित करू शकतील. पेटीएमने नुकतेच UPI स्टेटमेंट डाउनलोड फीचर लाँच केले आहे. सिंगापूरमध्ये प्रथमच सीमापार व्यक्ती ते व्यक्ती पेमेंट सेवा सुरू करण्यात आली होती. भारत आणि सिंगापूरने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये UPI आणि PayNow मधील कनेक्शन सुरू केले. 

टॅग्स :पे-टीएमऑनलाइनबँकिंग क्षेत्र