Join us
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! DA 'वर मोठी अपडेट, पगारात होणार भरघोस वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 16:14 IST

नव्या वाढीनंतर डीए ५० टक्क्यांवर पोहोचेल. ७व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, जर DA ५० टक्क्यांपर्यंत पोहोचला तर घरभाडे भत्ता म्हणजेच एचआरए देखील वाढेल. या वाढीमुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे टेक होम सॅलरी पॅकेज वाढणार आहे.

केंद्र सरकारसरकारी कर्मचाऱ्यांसाठी निवडणुकीपूर्वी आनंदाची बातमी देणार आहे. आज गुरुवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ टक्के महागाई भत्ता मंजूर होऊ शकतो. यामुळे देशातील एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या भत्त्यांमध्ये मोठी वाढ होणार आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळ लोकसभा निवडणुकीपूर्वी ४ टक्के महागाई भत्ता मंजूर करू शकतो. या मंजुरीमुळे कर्मचाऱ्यांचा भत्ता ५० टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने ४८.६७ लाख कर्मचारी आणि ६७.९५ लाख पेन्शनधारकांना लाभ देण्यासाठी भत्ता ४ टक्क्यांनी वाढवून ४६ टक्के केला होता. हा भत्ता १ जुलै २०२३ पासून लागू आहे.

एक मोठी ऑर्डर आणि गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या; 'या' एनर्जी कंपनीच्या शेअरला अपर सर्किट

नव्या वाढीनंतर डीए ५० टक्क्यांवर पोहोचेल. ७व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, जर DA ५० टक्क्यांपर्यंत पोहोचला तर घरभाडे भत्ता म्हणजेच एचआरए देखील वाढेल. या वाढीमुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे टेक होम सॅलरी पॅकेज वाढणार आहे.

वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार एचआरए वाढीसाठी शहरांची तीन श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे. या श्रेणी आहेत- X, Y आणि Z. जर X श्रेणीचा कर्मचारी शहरे/नगरांमध्ये राहत असेल, तर त्याचा HRA ३० टक्क्यांपर्यंत वाढेल. याप्रमाणे Y श्रेणीसाठी HRA दर २० टक्के आणि Z श्रेणीसाठी १० टक्के असेल. सध्या, शहरे/नगरे X, Y आणि Z मध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनुक्रमे २७, १८ आणि ९ टक्के HRA मिळतो.

टॅग्स :व्यवसायसरकार