नवी दिल्लीः देशभरात सोन्याच्या दरानं नवा उच्चांक गाठला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोनं महागल्यानं दिल्लीतल्या सराफा बाजारात 10 ग्राम म्हणजेच एक तोळा सोन्यामागे 50 रुपये वाढले आहेत. ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या मते, दिल्लीत 10 ग्राम सोन्याची किंमत 38,770 रुपयांवरून वाढून 38,820 रुपयांवर पोहोचली आहे. सोन्यासारखेच चांदीचे दरही तेजीनं वाढत आहेत. एक दिवसातच एक किलोग्राम चांदीचा भाव 1140 रुपयांनी वाढला असून, आता 45040 रुपये प्रति किलोग्रामवर सोनं पोहोचलं आहे. सोन्या-चांदीचे नवे दरः दिल्लीतल्या सराफा बाजारात सोन्याचे दर 50 रुपयांनी तेजीनं वाढून प्रति 10 ग्रामसाठी 38820 रुपयांवर पोहोचले आहेत. तर राजधानीत 99.9 टक्के शुद्ध सोन्याचे दर 50 रुपयांनी वाढून 38650 रुपये प्रति दहा ग्रामवर पोहोचले आहेत. तसेच 8 ग्रामवाल्या सोन्याचे वळाची किंमत 200 रुपयांनी वाढून 28800 रुपये प्रति 8 ग्रामवर पोहोचलं आहे. चांदीचा भावही 1100 रुपयांनी भडकला- चांदीची किंमत 1140 रुपयांनी वाढून 45040 रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे. चांदीच्या नाण्यांचा भाव लिवाल 91,000 रुपये आणि बिकवाल 92,000 रुपये प्रति शेकडा आहे.
'या' 5 कारणांमुळे सोनं महागतंय! चांदीही उच्चांकावर, जाणून घ्या नवे दर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 17:26 IST