Join us

Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 14:30 IST

Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान मंगळवारी सोन्याच्या दरात तेजी दिसून आली. पाहा काय आहेत नवे दर.

Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान मंगळवारी सोन्याच्या दरात तेजी दिसून आली. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव १२८ रुपयांनी वाढलाय. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७,२०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. गेल्या आठवड्यात २४ कॅरेट सोन्याच्या दरात १.५८ टक्क्यांची वाढ झाली आहे, तर गेल्या महिन्यात त्यात ४.९६ टक्क्यांची वाढ झाली. चांदीचा दर सध्या ९२,५०० रुपये प्रति किलोवर पोहोचलाय.

दिल्लीत सोन्या-चांदीचा भाव काय?

लाइव्ह मिंटनुसार, दिल्लीत आज सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ७६,४९३ रुपये झालाय. सोमवारी सोन्याचा भाव ७५,८२३ रुपये आणि मागील आठवड्यात सोन्याचा भा ७७,२३ रुपये होता. आज दिल्लीत चांदीचा भाव ९२,५०० रुपये प्रति किलो झालाय. सोमवारी तो ९२६०० रुपये प्रति किलो इतका होता. गेल्या आठवड्यात तो ९४१०० रुपये किलो होता.

मुंबईत सोन्याचा भाव काय?

मुंबईत आज सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ७६,३४७ रुपयांवर पोहोचला आहे. सोमवारी येथे सोन्याचा भाव ७५,६७७ रुपये आणि मागील आठवड्यात ७६,८७७ रुपये होता. आज मुंबईत चांदीचा भाव ९१,८०० रुपये प्रति किलो झालाय. सोमवारी चांदीचा भाव ९१,९०० रुपये प्रति किलो होता.

का आली तेजी?

गेल्या आठवडय़ातील जोरदार तेजीनंतर नफावसुलीमुळे अमेरिकी डॉलर घसरल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली. जागतिक स्तरावर सोन्याची किंमत डॉलरमध्ये निश्चित केली जाते, त्यामुळे अमेरिकन चलन कमकुवत झाल्यास इतर चलनांचा वापर करणाऱ्या खरेदीदारांना बुलियन अधिक परवडणारा होतो.

 

टॅग्स :सोनंचांदी