Join us
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हीच सांगा कसे खरेदी करू...! सोन्याचे दर एवढे वाढले की अनेकांची हिंमत होणार नाही...; चांदी तर चार लाखांपार गेली 

By मोरेश्वर मानापुरे | Updated: January 29, 2026 19:49 IST

Gold Silver Rates 2026 Today: सराफा बाजारात सोन्या-चांदीचा भडका! २४ कॅरेट सोने १.८६ लाखांवर तर चांदी ४.०५ लाखांवर पोहोचली. एका दिवसात १७,५०० रुपयांची वाढ.

- मोरेश्वर मानापुरे 

नागपूर: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच महागाईचा मोठा भडका उडाला असून, नागपूरच्या सराफा बाजारात मौल्यवान धातूंनी गगनभरारी घेतली आहे. सोन्याच्या दराने ३ टक्के जीएसटीसह १.८६ लाखांचा टप्पा ओलांडला असून, चांदीने प्रथमच ४.५ लाख रुपयांचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. यामुळे गुंतवणूकदार आणि सामान्य ग्राहक दोघांच्याही भुवया उंचावल्या आहेत.

२९ जानेवारीला ३ टक्के जीएसटीसह दहा ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे दर १,८६,८०० रुपये आणि चांदी तब्बल ४,०५,२०० रुपयांवर पोहोचली. बुधवार, २८ जानेवारीच्या तुलनेत गुरुवारी सोन्यात १७,५०० आणि चांदीत २२ हजार रुपयांची वाढ झाली. नवीन वर्षात झालेली ऐतिहासिक दरवाढ सराफा क्षेत्रात थक्क करणारी आहे.

नवीन वर्षात सोने ५३,५०० आणि चांदीत १,६९,५०० रुपयांची वाढवर्ष-२०२६ मध्ये २९ दिवसांत सोने ५३,५०० आणि चांदी १,६९,५०० रुपयांनी महागली. लग्नसराईचे दिवस असून किमती आवाक्याबाहेर गेल्याने खरेदीवर परिणाम झाला आहे. दुसरीकडे जुन्या गुंतवणूकदारांसाठी हा मोठा नफा ठरत आहे. सोन्या-चांदीच्या दरवाढीच्या या गतीने सामान्यांचे बजेट कोलमडले असून खरेदीदारांची चिंता वाढली आहे. आता दागिन्यांची खरेदी करायची की नाही, अशा पेचात ग्राहक पडले आहेत.

जागतिक घडामोडी आणि शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्या-चांदीकडे कल वाढला आहे. परिणामी, स्थानिक बाजारात ही मोठी दरवाढ पाहायला मिळत असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Gold, silver prices skyrocket; buying becomes difficult amid inflation.

Web Summary : Nagpur's gold and silver prices surge to record highs, exceeding ₹1.86 lakhs and ₹4.5 lakhs respectively. This spike, driven by global events, impacts buyers and investors, creating budget concerns during wedding season. Experts note increased safe-haven demand.
टॅग्स :सोनंचांदी