Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत सलग नऊ दिवस झालेल्या घसरणीनंतर आता पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळत आहे. MCX वर चांदीची किंमत सुमारे ५.५% किंवा १२,००० रुपयांहून अधिक वाढून २,३६,१३७ रुपये प्रति किलोवर पोहोचली. दरम्यान, सोन्याची किंमत ४% किंवा ५,५०० रुपयांहून अधिक वाढून १,४४,४३४ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचली आहे.
दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं २% पेक्षा जास्त वधारलं. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, बुधवारी डॉलरचं मूल्य घसरल्यानं, युद्ध संपण्याचे संकेत मिळाल्यानं आणि कच्च्या तेलातील घसरणीमुळए स्पॉट गोल्ड २.१% वाढून ४,५६८.२९ डॉलर प्रति औंस वर पोहोचलं. एप्रिल डिलिव्हरीसाठी अमेरिकन गोल्ड फ्युचर्स ३.८% वाढून ४,५६९.४० डॉलर झालं, तर स्पॉट सिल्व्हर ३.८% वाढून ७३.९४ डॉलर प्रति औंस झालं आहे.
युद्धाच्या सावटात शांततेच्या आशेनं सोन्याला आधार
अमेरिका आणि इराण यांच्यात संभाव्य चर्चा सुरू असल्याच्या बातम्यांमुळे सोन्याच्या किमतीत ही वाढ झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संकेत दिले आहेत की, मध्य पूर्वेतील युद्ध संपवण्यासाठी राजनैतिक मार्ग शोधला जात आहे. अहवालांनुसार, लवकरच उच्चस्तरीय शांतता चर्चा होऊ शकते, मात्र इराणच्या अंतिम प्रतिक्रियेची अद्याप प्रतीक्षा आहे. या बातमीमुळे बाजारपेठेत सकारात्मक वातावरण निर्माण झालंय.
तेल स्वस्त, डॉलर कमकुवत, सोनं मजबूत
ब्लूमबर्गच्या मते, सोन्यातील तेजीमागे कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण आणि डॉलरचं कमकुवत होणं ही महत्त्वाची कारणं आहेत. डॉलर इंडेक्स सुमारे ०.२% घसरल्यानं गुंतवणूकदारांसाठी सोनं स्वस्त आणि आकर्षक झालंय. विशेष म्हणजे, गेल्या काही आठवड्यांत सोनं शेअर बाजाराच्या बरोबरीनं चालत होतं.
युद्ध आणि महागाईचा दबाव
सोन्यात तेजी आली असली तरी बाजारपेठेत अजूनही अनिश्चितता कायम आहे. इराणने होर्मुज सामुद्रधुनीवर (Strait of Hormuz) आपली पकड कायम ठेवली असून इस्रायलचे हल्ले सुरूच आहेत. अमेरिकेनेही सुमारे २,००० सैनिक मध्य पूर्वेत पाठवण्याचा निर्णय घेतलाय. ऊर्जेच्या किमतीत वाढ झाल्यामुळे महागाईचा धोका वाढला असून, यामुळे व्याजदर चढे राहू शकतात, जे सोन्यासाठी नकारात्मक संकेत आहेत.
या महिन्यात सोन्यात १५% घसरण
मार्च महिन्यात सोन्याच्या किमतीत सुमारे १५% पर्यंत घसरण झाली आहे. युद्धामुळे तेलाचे दर १२० डॉलरपर्यंत पोहोचले होते, ज्यामुळे महागाई आणि व्याजदरांची चिंता वाढली आणि सोन्यात मोठ्या प्रमाणावर विक्री दिसून आली.
Web Summary : Gold rebounds after nine days of decline, rising ₹5500. Silver surges ₹12000 to ₹2,36,137/kg on MCX. International gold rises amid dollar weakness and peace hopes. Experts predict potential price drops despite current volatility.
Web Summary : सोने की कीमतों में नौ दिनों की गिरावट के बाद उछाल, ₹5500 बढ़ा। चांदी एमसीएक्स पर ₹12000 बढ़कर ₹2,36,137/किलो हुई। डॉलर की कमजोरी और शांति की उम्मीदों के बीच अंतरराष्ट्रीय सोना बढ़ा। विशेषज्ञ वर्तमान अस्थिरता के बावजूद संभावित मूल्य गिरावट की भविष्यवाणी करते हैं।