Gold Silver Price Today: सोने आणि चांदीच्या भावात आज मोठा बदल पाहायला मिळाला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, आज मंगळवारी सोन्याच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव १,३९,५१३ रुपये प्रति १० ग्रॅम झालाय. यापूर्वी सोमवारी हा दर १,३९,५६९ रुपये होता, म्हणजेच आज सोनं ५६ रुपयांनी स्वस्त झालंय. २२ कॅरेट सोन्याचा विचार केल्यास, आज हा दर १,३८,९५४ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला असून यामध्ये ५६ रुपयांची घसरण झाली. सोमवारी याची किंमत १,३९,०१० रुपये होती.
१८ कॅरेट सोन्याचे आणि इतर बाजारातील दर
१८ कॅरेट सोने आज मंगळवारी १,२७,७९४ रुपये प्रति १० ग्रॅम दरानं विकलं जात आहे. याचा आधीचा बंद भाव १,२७,८४५ रुपये होता, म्हणजेच आज यात ५१ रुपयांची घट झाली आहे. दरम्यान, bullions.co.in नुसार, आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात ५८० रुपयांची घसरण नोंदवण्यात आली असून ते १,३९,३९० रुपये प्रति १० ग्रॅमवर विकलं जात आहे.
घरबसल्या पासपोर्ट कसा काढायचा? पाहा सोपी प्रक्रिया
आजचे चांदीचे दर
IBJA नुसार, आज एक किलो चांदीची किंमत २,२०,३५३ रुपये आहे. यापूर्वी सोमवारी चांदी २,१९,२६० रुपये प्रति किलो दराने विकली जात होती. म्हणजेच आज चांदीच्या दरात १,०९३ रुपये प्रति किलोची वाढ दिसून आली आहे. मात्र, bullions.co.in नुसार चांदी २,२१,८०० रुपये प्रति किलो दरानं विकली जात असून, त्यात ४,१४० रुपयांची मोठी घसरण झाली आहे. IBJA दिवसातून दोनदा सोन्या-चांदीचे दर जाहीर करते.
जाणकारांचं मत काय?
तज्ज्ञांच्या मते, अमेरिका आणि इराणमधील तणाव कमी होण्याचे संकेत मिळत असतानाच बाजारपेठेत हा दबाव आला आहे. मात्र, सततच्या महागाईच्या भीतीमुळे अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदरात बदल करणार नसल्याची शक्यता गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर परिणाम करत आहे. याव्यतिरिक्त, असाही अंदाज लावला जात आहे की जगभरातील मध्यवर्ती बँका महागाईचा सामना करण्यासाठी त्यांच्या सोन्याचा साठा विकू शकतात. यामुळे बाजारात पुरवठा वाढून सोन्या-चांदीच्या किमती आणखी खाली येण्याची शक्यता आहे.
Web Summary : Gold prices dipped slightly today, while silver saw a mixed trend. 24-carat gold decreased by ₹56, while silver increased by ₹1,093 per kg according to IBJA. Experts suggest global factors influence market pressures.
Web Summary : सोने की कीमतों में आज थोड़ी गिरावट आई, जबकि चांदी में मिला-जुला रुख रहा। आईबीजेए के अनुसार 24 कैरेट सोने में ₹56 की कमी आई, जबकि चांदी में ₹1,093 प्रति किलो की वृद्धि हुई। विशेषज्ञों का सुझाव है कि वैश्विक कारक बाजार के दबाव को प्रभावित करते हैं।