Join us

Gold Silver Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, एकाच दिवसात चांदी ₹२१२२ स्वस्त; Gold किती घसरलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 14:21 IST

Gold Silver Price 9 October: सोन्या-चांदीच्या दरात बुधवारी मोठी घसरण झाली. पाहा काय १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे नवे दर.

Gold Silver Price 9 October: आज म्हणजेच बुधवार ९ ऑक्टोबर रोजी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. तर दुसरीकडे चांदी २१२२ रुपयांनी स्वस्त होऊन ८८२९० रुपये प्रति किलोवर उघडली. आयबीजेएच्या दरानुसार आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ८९२ रुपयांनी कमी होऊन ७४८३४ रुपयांवर आला. सोन्या-चांदीचे हे दर आयबीजेएनं जाहीर केले आहेत. यावर जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्जेसचा समावेश नाही. आपल्या शहरातील सोने-चांदीच्या दरात १००० ते २००० असू शकतो.

१४ ते २३ कॅरेट सोन्याचे दर

आज २३ कॅरेट सोन्याचा भाव ८८८ रुपयांनी कमी होऊन ७४५३४ रुपये प्रति १० ग्रॅम झालाय. आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ८१७ रुपयांनी कमी होऊन ६८,५८४ रुपये प्रति १- ग्रॅम झाला आहे. दुसरीकडे १८ कॅरेट सोन्याचा भाव आज ६६९ रुपये प्रति १० ग्रॅमनं घसरला आणि तो ५६१२६ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडला. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव ५२२ रुपयांनी कमी होऊन ४३७७८ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (आयबीजेए) ही १०४ वर्षे जुनी संघटना आहे. आयबीजेए दिवसातून दोनदा दुपारी आणि संध्याकाळी सोन्याचे दर जाहीर करते. अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं जारी केलेल्या विविध अधिसूचनेनुसार हे दर सॉवरेन आणि बॉन्ड जारी करण्यासाठी बेंचमार्क दर आहेत. आयबीजेएची २९ राज्यांमध्ये कार्यालये आहेत आणि ती सर्व सरकारी संस्थांचा भाग आहे.

 

टॅग्स :सोनंचांदी