Join us
Daily Top 2Weekly Top 5

Gold Silver Rate MCX: सोन्या-चांदीच्या दरात मोठे बदल; पाहा काय आहेत गोल्ड-सिल्व्हरचे लेटेस्ट दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 10:19 IST

Gold Silver Rate MCX: आज शुक्रवार, १३ मार्च २०२६ रोजी सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ पाहायला मिळत आहे. सध्या जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १०० डॉलरच्या पार गेल्या आहेत.

Gold Silver Rate MCX: आज शुक्रवार, १३ मार्च २०२६ रोजी सोन्या-चांदीच्या किमतीत किरकोळ वाढ पाहायला मिळत आहे. सध्या जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १०० डॉलरच्या पार गेल्या आहेत. डॉलर मजबूत होत असून रुपया कमकुवत होत असल्यामुळे सोन्या-चांदीच्या दरात मोठी चढ-उतार पाहायला मिळतेय. 'मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया' (MCX) वर आज सोन्याचा दर १४१ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा दर ८१६ रुपये प्रति किलोच्या वाढीसह खुला झाला. 

आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी बाजार उघडताच सोन्याची किंमत १,६०,३२६ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा भाव २,६८,९८२ रुपये प्रति किलोवर आला आहे. यापूर्वी गुरुवारी सोन्याचा हाजिर भाव १,६०,१८५ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा हाजिर भाव २,६८,१६६ रुपये प्रति किलोवर बंद झाला होता.

किमतीत चढ-उतार होण्याची प्रमुख कारणं

अमेरिकेतील महागाईच्या आकडेवारीवरून असं दिसतं की फेडरल रिझर्व्ह लवकर व्याजदरात कपात करणार नाही. उच्च व्याजदर हे सोन्या-चांदीसारख्या मालमत्तेसाठी सहसा नकारात्मक मानले जातात. याव्यतिरिक्त, काही काळापूर्वी सोन्यात मोठी तेजी आल्यानंतर आता गुंतवणूकदारांनी नफा वसुली सुरू केली आहे. आगामी दिवाळीचा दबाव वाढल्यानेही किमतीत चढ-उतार होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. दुसरीकडे मध्य पूर्वेतील तणाव हेदेखील महत्त्वाचं कारण आहे.

देशातील प्रमुख शहरांमधील सोन्या-चांदीचे भाव

भारतातील विविध महानगरांमध्ये आज सोन्या-चांदीचे दर वेगवेगळे नोंदवण्यात आले आहेत. राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याची किंमत १,६१,३९० रुपये प्रति १० ग्रॅम आणि २२ कॅरेट सोन्याचा दर १,४७,९३० रुपये झाला आहे, तर तिथे चांदी २,८०,००० रुपये प्रति किलोनं विकली जात आहे. मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव १,६१,२४० रुपये प्रति १० ग्रॅम असून चांदीचा दर २,७९,९०० रुपये प्रति किलो आहे.

कोलकात्यात २४ कॅरेट आणि २२ कॅरेट सोन्याचे दर अनुक्रमे १,६१,२४० रुपये आणि १,४७,८०० रुपये प्रति १० ग्रॅम इतके आहेत, तर चांदीची किंमत २,८०,००० रुपये प्रति किलो आहे. चेन्नईमध्ये आज सोन्याचा दर सर्वाधिक असून तिथे २४ कॅरेट सोन्याचा भाव १,६२,५६० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचलाय, तर एक किलो चांदीसाठी ग्राहकांना २,९०,००० रुपये मोजावे लागत आहेत.

टॅग्स :सोनंचांदीगुंतवणूक