Join us

gold silver prices : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 05:32 IST

gold silver prices : गेल्या अनेक दिवसांपासून किरकोळ चढ-उतार असलेल्या सोन्या-चांदीच्या भावात सोमवार, ९ ऑगस्ट रोजी मोठी घसरण झाली होती.

जळगाव : आठवड्याच्या सुरुवातीलाच घसरण झालेल्या सोने-चांदीच्या दरात शनिवारी भाववाढ झाली. यामुळे चांदी एक हजाराने वधारून ६६ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली, तर सोन्यातही ५०० रुपयांनी वाढ होऊन ते ४८ हजार ३०० रुपयांवर पोहोचले.गेल्या अनेक दिवसांपासून किरकोळ चढ-उतार असलेल्या सोन्या-चांदीच्या भावात सोमवार, ९ ऑगस्ट रोजी मोठी घसरण झाली होती. त्यात पुन्हा मंगळवारी १ हजार ५०० रुपयांची घसरण झाली व ती ६५ हजारांवर आली होती. तेव्हापासून ती याच भावावर स्थिर होती. मात्र शनिवारी १ हजार रुपयांची वाढ होऊन चांदी ६६ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली. सोने चार दिवस स्थिर राहिल्यानंतर शुक्रवारी त्यात ४०० रुपयांची वाढ झाली व शनिवारी पुन्हा ५०० रुपयांची वाढ होऊन ते ४८ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे.

टॅग्स :सोनंचांदी