Gold Silver Rate Today: देशांतर्गत वायदा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर बाजार उघडताच सोन्याच्या भावात ४.९२% आणि चांदीच्या दरात ६% घसरण नोंदवण्यात आली. या घसरणीनंतर सोन्याचा भाव १,३७,३७७ रुपये प्रति दहा ग्रॅम आणि चांदीचा भाव २,१३,१६६ रुपये प्रति किलोवर पोहोचलाय. मध्य-पूर्वेतील वाढत्या तणावामुळे डॉलर मजबूत होत असून, त्याचा थेट परिणाम म्हणून किमतीत ही घट झाली आहे.
सोने आणि चांदीच्या किमतीत घट
शुक्रवारी सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम १,४४,८२५ रुपयांवर बंद झाले होते. आज बाजारात सोन्याची सुरुवात ७,४४८ रुपयांच्या मोठ्या घसरणीसह झाली. चांदीच्या बाबतीत बोलायचं झाले तर, शुक्रवारी चांदी २,२७,४७० रुपये प्रति किलोवर बंद झाली होती, जी आज १४,३०४ रुपयांच्या घसरणीसह उघडली.
दिल्ली आणि मुंबईतील सोने-चांदीचे दर
राजधानी दिल्लीत आज २४ कॅरेट सोन्याचा दर १,४६,११० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तसंच २२ कॅरेटसाठी १,३३,९४० रुपये आणि १८ कॅरेटसाठी १,०९,६२० रुपये मोजावे लागत आहेत. दिल्लीत एक किलो चांदीची किंमत २,४४,९०० रुपये झाली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत २३ मार्च रोजी २४ कॅरेट सोन्याची किंमत १,४५,९६० रुपये प्रति १० ग्रॅम, २२ कॅरेटसाठी १,३३,७९० रुपये आणि १८ कॅरेटसाठी १,०९,४७० रुपये नोंदवण्यात आली आहे. मुंबईत चांदीचा दर २,४४,९०० रुपये प्रति किलो झालाय.
बंगळुरू आणि चेन्नईमधील ताजे दर
बंगळुरूमध्ये आज २४ कॅरेट सोन्याचा दर १,४५,९६० रुपये प्रति १० ग्रॅम आणि २२ कॅरेटचा दर १,३३,७९० रुपये इतका आहे. तेथे चांदीची किंमत २,४४,९०० रुपये प्रति किलो झाली. चेन्नईमध्ये सोन्याचे दर इतर शहरांच्या तुलनेत थोडे जास्त असून तेथे २४ कॅरेट सोन्याचा भाव १,४८,५७० रुपये प्रति १० ग्रॅम, २२ कॅरेटसाठी १,३६,१९० रुपये आणि १८ कॅरेटसाठी १,१३,५९० रुपये इतका आहे. चेन्नईत एक किलो चांदीची किंमत २,४९,९०० रुपये आहे.
Web Summary : Gold and silver prices drastically fell in Indian markets. MCX saw gold drop 4.92%, silver 6%. Delhi gold (24K) is ₹1,46,110/10g. Mumbai: ₹1,45,960/10g. Global tensions, strong dollar cited.
Web Summary : भारतीय बाजारों में सोना और चांदी की कीमतों में भारी गिरावट आई। एमसीएक्स में सोने में 4.92%, चांदी में 6% की गिरावट देखी गई। दिल्ली में सोना (24K) ₹1,46,110/10 ग्राम है। मुंबई: ₹1,45,960/10 ग्राम। वैश्विक तनाव और मजबूत डॉलर का हवाला दिया गया।