Join us

आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 20:30 IST

तज्ज्ञांच्या मते सोन्याचा दर आणखी खाली येण्याची शक्यता आहे...

गेल्या काही दिसांपूर्वी सोन्याच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला होता. मात्र, यानंतर सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे. एमसीएक्‍स (MCX) आणि सराफा बाजारात मंगळवारीही सोन्याच्या दरात घसरण बघायला मिळाली. मध्यपूर्वेकडील तणाव कमी झाल्यानंतर ही घसरण होताना दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते सोन्याचा दर आणखी खाली येण्याची शक्यता आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेन्जवरही (mcx gold price) आज सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण दिसून आली आहे. गेल्या काही दिवसांत आलेल्या तेजीनंतर आता सोन्याचा दर घसरताना दिसत आहे. जागतिक बाजारातही सोन्याच्या दरात शिथिलता दिसत आहे. एमसीएक्‍सवर मंगळवारी जवळपास 300 रुपयांच्या घसरणीसह व्यवहार सुरू करणाऱ्या सोन्याच्या दरात सांयकाळच्या वेळी 700 रुपयांहूनही अधिकची घसरण दिसून आली. सध्या सोन्याचा दर 746 रुपयांच्या घसरणीसह 70856 रुपयांवर आला आहे. याच प्रमाणे चांदीही 1357 रुपयांनी घसरून 81126 रुपये प्रत‍ि क‍िलोवर ट्रेंड करत आहे.

IBJA च्या वेबसाइटनं जारी केले दर -सराफा बाजारातही सातत्याने घसरण दिसून येत आहे. IBJA च्या वेबसाइटनुसार, मंगळवारी 24 कॅरेट सोने 400 रुपयांनी घसरून 71963 रुपये प्रत‍ि 10 ग्रॅमवर दिसून आले. 23 कॅरेट सोन्याचा दर 71675 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचा दर 65918 रुपये प्रत‍ि 10 ग्रॅमवर दिसून आला. चांदीच्या दरातही मोठी घसरण दिसून आली आहे. चांदी 1000 रुपये प्रत‍ि क‍िलोहून अधिकने घसरून 80047 रुपये प्रत‍ि क‍िलो वर खुली झाली.

आतापर्यंत किती रुपयांनी घसरलं सोनं? - IBJA वेबसाइटनुसार, 19 एप्रिल रोजी सोन्याने 73596 रुपये प्रति 10 ग्रॅमचा विक्रमी उच्चांक गाठला होता. यावर 3 टक्के जीएसटी लावल्यास हा दर प्रति 10 ग्रॅम 75804 रुपयांवर पोहोचतो. 30 एप्रिलला हा दर 71963 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. जीएसटीसह तो 74,122 रुपयांवर जातो. अर्थात, गेल्या 10 दिवसांत सोन्याचा दर सुमारे 1700 रुपयांनी घसरला आहे.

IBJA की वेबसाइट के अनुसार 19 अप्रैल को सोने ने 73596 रुपये प्रत‍ि 10 ग्राम का ऑल टाइम हाई टच क‍िया. यद‍ि इस पर 3 प्रत‍िशत जीएसटी लगाएं तो इसका रेट 75804 रुपये प्रत‍ि 10 ग्राम होता है. 30 अप्रैल को रेट ग‍िरकर 71963 रुपये प्रत‍ि 10 ग्राम पर आ गया. जीएसटी के साथ यह 74,122 रुपये हुआ. इस तरह प‍िछले 10 द‍िन में ही सोना करीब 1700 रुपये टूट गया है. 

टॅग्स :सोनंचांदीबाजार