Gold-Silver Price Today 13 feb 2026: एमसीएक्स (MCX) वर तेजी असूनही सराफा बाजारात आज सोन्याच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळत आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर २,८९९ रुपयांनी कमी होऊन १,५२,७५१ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडला. आता सराफा बाजारात सोनं त्याच्या १,७६,१२१ रुपयांच्या उच्चांकी पातळीवरून २३,३७० रुपयांनी स्वस्त झालंय.
जीएसटीसह सोन्याचा आजचा दर १,५७,३३३ रुपयांवर पोहोचलाय. दुसरीकडे, प्लॅटिनमच्या दरातही ३,७८९ रुपयांची घसरण झाली असून तो ६४,६९४ रुपयांवर आला आहे. गुरुवारी जीएसटीशिवाय सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,५५,५०७ रुपयांवर बंद झाला होता. हे दर 'आयबीजेए' (IBJA) कडून जारी करण्यात आले आहेत. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जाहीर करते.
काय आहे EPFO ची 'ती' योजना, ज्यात प्रीमिअम न भरताच मिळतं ₹७ लाखांचं कव्हर; जाणून घ्या
१८ आणि २२ कॅरेट सोन्याचे दर
२२ कॅरेट सोन्याच्या दरात २,६५५ रुपयांची मोठी घट झाली असून तो आता १,३९,९२० रुपये प्रति १० ग्रॅमवर आला. जीएसटीसह हा दर १,४४,११७ रुपये इतका आहे. त्याचप्रमाणे १८ कॅरेट सोन्याच्या दरातही २,१७५ रुपयांची घट नोंदवण्यात आली. आज १८ कॅरेट सोनं १,१४,५६३ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडलं असून जीएसटीसह याची किंमत १,१७,९९९ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचली.
१४ आणि २३ कॅरेट सोन्याचे दर
१४ कॅरेट सोन्याचा दर १,६९६ रुपयांनी घसरून ८९,३५९ रुपयांवर उघडला असून जीएसटीसह सोनं ९२,०३९ रुपये प्रति १० ग्रॅम दरानं मिळेल. तसंच २३ कॅरेट सोनं आज २,८८८ रुपयांनी स्वस्त होऊन १,५२,१३९ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडलं. जीएसटीसह २३ कॅरेट सोन्याची किंमत आता १,५६,७०३ रुपये झाली आहे.
Web Summary : Gold prices fell sharply today, down ₹2,899 to ₹1,52,751 per 10 grams. It's now ₹23,370 cheaper than its peak. Other variants also saw significant drops. 22 Carat gold fell by ₹2,655 to ₹1,39,920 per 10 grams.
Web Summary : आज सोने की कीमतों में भारी गिरावट आई, ₹2,899 घटकर ₹1,52,751 प्रति 10 ग्राम हो गया। यह अब अपने शिखर से ₹23,370 सस्ता है। अन्य वेरिएंट में भी महत्वपूर्ण गिरावट देखी गई। 22 कैरेट सोना ₹2,655 गिरकर ₹1,39,920 प्रति 10 ग्राम हो गया।