Join us

Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 15:05 IST

Gold Silver Price Today 25 November: ज्या घरांमध्ये विवाहाची तयारी सुरू असेल त्यांच्यासाठी सध्या आनंदाची बातमी आहे. आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली.

Gold Silver Price Today 25 November: ज्या घरांमध्ये विवाहाची तयारी सुरू असेल त्यांच्यासाठी सध्या आनंदाची बातमी आहे. आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव १०८९ रुपयांनी घसरून ७६,६९८ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर चांदीच्या दरात आज १७६२ रुपयांची घसरण झाली. आज चांदी ८९,०८८ रुपयांवर उघडली. हा दर आयबीएचा आहे. यावर जीएसटीचा समावेश नाही. तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकतो.

दिल्लीत सोन्या-चांदीचे दर

लाइव्ह मिंटनुसार, दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ७९,८०३ रुपये झाला. गेल्या आठवड्यात सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ७६,४९३ रुपये होता. आज चांदीचा भाव ९५,००० रुपये प्रति किलो आहे. तर गेल्या आठवड्यात तो ९२,५०० रुपये प्रति किलो होता.

चेन्नई सोन्याचा दर काय?

चेन्नईत आज सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ७९६५१ रुपये आहे. गेल्या आठवड्यात तो ७६,३४१ रुपये प्रति १० ग्रॅम होता. चेन्नईत आज चांदीचा भाव १,०३,६०० रुपये प्रति किलो असून गेल्या आठवड्यात तो १,०१,६०० रुपये प्रति किलो होता.

मुंबईत सोन्याचा दर

आज मुंबईत सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ७९,६५७ रुपये झाला. गेल्या आठवड्यात सोन्याचा भाव ७६,३४७ रुपये प्रति १० ग्रॅम होता. मुंबईत आज चांदीचा भाव ९४,३०० रुपये प्रति किलो झाला असून गेल्या आठवड्यात तो ९१,८०० रुपये प्रति किलो होता.

कोलकात्यात आज सोन्याचा दर

कोलकात्यात आज सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ७९,६५५ रुपये झाला असून गेल्या आठवड्यात तो ७६,३४५ रुपये प्रति १० ग्रॅम होता. कोलकात्यात आठवड्यात चांदीचा भाव ९३,३०० रुपये प्रति किलो होता.

टॅग्स :सोनंचांदी