Gold Silver Price Today 9 March 2026: इस्रायल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर, आज सोमवारी सोनं आणि चांदीच्या दरात मोठा बदल पाहायला मिळाला आहे. सराफा बाजारात आज दोन्ही धातूंच्या किमतीत मोठी घसरण नोंदवण्यात आली. 'ibjarates.com' नुसार, ९ मार्च रोजी ९९९ शुद्धतेचे सोने १,५९,५६८ रुपये प्रति १० ग्रॅम दरानं मिळत आहे. शुक्रवारी याची किंमत १,५८,७५१ रुपये होती, म्हणजेच आज सोनं ८१७ रुपयांनी स्वस्त झालं आहे.
तसंच, ९९५ शुद्धतेच्या सोन्याची किंमत आज १,५८,९२९ रुपये प्रति १० ग्रॅम असून त्यात ८१४ रुपयांची घसरण झाली आहे. दुसरीकडे, 'bullions.co.in' नुसार, २४ कॅरेट सोन्याच्या दरात ४८० रुपयांची घट होऊन ते १,६१,८०० रुपये प्रति १० ग्रॅमवर विकलं जात आहे.
११५ डॉलर्स प्रति बॅरल पर्यंत पोहोचलं कच्चं तेल; पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारचा प्लॅन काय?
चांदीच्या दरात २,००० रुपयांहून अधिकची कपात
चांदीच्या किमतीबद्दल बोलायचं झाले तर, 'आयबीजेए' (IBJA) नुसार आज एक किलो चांदीची किंमत २,६०,७२३ रुपये प्रति किलो झाली आहे. गेल्या शुक्रवारी ही किंमत २,६२,८०३ रुपये प्रति किलो होती, म्हणजेच आज चांदीच्या दरात २,०८० रुपयांची घसरण झाली आहे. 'bullions.co.in' वर चांदी २,६६,६५० रुपये प्रति किलो दरानं विकली जात असून, त्यात २,२१० रुपयांची मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. विशेष म्हणजे 'आयबीजेए' दिवसातून दोनदा सोने-चांदीचे दर जाहीर करते.
काय म्हणाले एक्सपर्ट्स?
पश्चिम आशियातील संघर्षामुळे सोन्याच्या किमतीत पुढील आठवड्यातही चढ-उतार सुरू राहण्याची शक्यता असल्याचं विश्लेषकांनी म्हटलंय. 'जेएम फायनान्शिअल सर्व्हिसेस'चे उपाध्यक्ष प्रणव मेर यांच्या मते, तणाव वाढल्यास सोन्याच्या किमतीवर सकारात्मक परिणाम होईल, मात्र तणाव कमी होण्याचे संकेत मिळाल्यास मोठी विक्री होऊ शकते. चांदीमध्ये सध्या मर्यादित प्रमाणात चढ-उतार होत असले तरी त्यात मोठी अस्थिरता दिसून येत आहे. सोनं तसंच तांबे आणि जस्त यांसारख्या औद्योगिक धातूंमधील हालचालींमुळे चांदीचा नफा सध्या मर्यादित आहे.
बाजारातील चढ-उतार आणि प्रमुख घटक
'एंजल वन'चे प्रथमेश एम. यांच्या मते, गेल्या आठवड्यात सोन्याची किंमत १.५९ लाख ते १.७० लाख रुपये प्रति १० ग्रॅमच्या दरम्यान राहिली. जागतिक स्तरावरील तणाव, आशियाई देशांमधील मागणी, मध्यवर्ती बँकांची खरेदी, अमेरिकन ट्रेझरी बाँडचा परतावा आणि डॉलरची मजबूती हे घटक सध्या सराफा बाजारातील किमतींवर परिणाम करत आहेत.
Web Summary : Amidst Israel-Iran tensions, gold and silver prices fell sharply. Gold decreased by ₹817 per 10 grams, while silver plummeted by ₹2,210 per kg. Analysts predict continued volatility due to global tensions and economic factors.
Web Summary : इजराइल-ईरान तनाव के बीच, सोना और चांदी की कीमतों में भारी गिरावट आई। सोना ₹817 प्रति 10 ग्राम सस्ता हुआ, जबकि चांदी ₹2,210 प्रति किलो गिरी। विश्लेषकों का अनुमान है कि वैश्विक तनाव और आर्थिक कारकों के कारण अस्थिरता जारी रहेगी।