Join us

Gold Price Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या नवे दर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 15:16 IST

Gold/Silver Price Today, 6th September 2021: गेल्या सत्रात सोन्याच्या दरात वाढीची नोंद झाल्यानंतर आज देशात सोन्याच्या दरात घसरणीची नोंद झाली आहे.

Gold/Silver Price Today, 6th September 2021: गेल्या सत्रात सोन्याच्या दरात वाढीची नोंद झाल्यानंतर आज देशात सोन्याच्या दरात घसरणीची नोंद झाली आहे. तर चांदीच्या दरात किंचिंत वाढ झाली आहे. सोमवारी मल्टी कमॉडिटी एक्स्चेंजवर (MCX) ऑक्टोबरसाठीच्या सोन्याच्या वायदा दरात ०.१८ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. तर डिसेंबरसाठीच्या चांदीच्या वायदा दरात ०.३४ टक्क्यांची तेजी नोंदविण्यात आली आहे. (Gold Silver Price Today on 6 September 2021 Gold rate today fall a day after big jump)

गेल्या सत्रात सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅममागे ५०० रुपयांची दरवाढ झाली होती. तर चांदीच्या दरात प्रतिकिलो तब्बल १९०० रुपयांची वाढ झाली होती. अमेरिकेतील रोजगाराच्या निराशाजनक आकडेवारी पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात सोनं, चांदीच्या दरात वाढ नोंदविण्यात आली होती. 

सोनं, चांदीचा आजचा दर काय?एमसीएक्सवर ऑक्टोबरसाठीच्या वायदा दरात घट नोंदविण्यात आली आहे. सोन्याचा आजचा दर प्रति १० ग्रॅमसाठी ४७,४४० रुपये इतका आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर १८२६.६५ डॉलर प्रतिऔंस इतका आहे. 

डिसेंबरसाठीच्या चांदीच्या वायदा दरात २२१ रुपयांची वाढ नोंदवली गेली असून प्रतिकिलो ६५,४३० रुपये इतक्या दरावर चांदी ट्रेंड होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी २४.६० डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत आहेत. 

टॅग्स :सोनंचांदी