Join us

Gold-Silver Price : रशिया-युक्रेन संघर्षाचा पुन्हा सोन्या-चांदीच्या दरावर मोठा परिणाम! जाणून घ्या आजचे दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 16:18 IST

Gold-Silver Price Today, 28th Febuary 2022: भारतीय सराफा बाजाराने आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवार 28 फेब्रुवारी 2022 रोजी सोने आणि चांदीचे दर जाहीर केले आहेत.

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे (Russia-Ukraine War) संपूर्ण जग चिंतेत आहे. जागतिक बाजारपेठेवरही या युद्धाचा मोठा परिणाम होत आहे. रशिया-युक्रेन संघर्ष (Russia-Ukraine Crisis)काळात सोन्या-चांदीच्या दरातही ((Gold-Silver Price) सातत्याने चढ-उतार होत आहेत. 25 फेब्रुवारीला जिथे सोन्या-चांदीच्या किमतीत वर्षभरातील सर्वात मोठी घसरण पाहायला मिळाली, तिथे दोन दिवसांनंतर म्हणजेच 28 फेब्रुवारीला सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

भारतीय सराफा बाजाराने आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवार 28 फेब्रुवारी 2022 रोजी सोने आणि चांदीचे दर जाहीर केले आहेत. त्यानुसार सोन्या-चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. सोने महागले (Gold Rate) असून 51 हजार रुपयांच्याजवळ (प्रति 10 ग्रॅम) पोहोचले आहे. त्याचबरोबर चांदीचा भाव (Silver Rate) 65 हजार रुपयांच्या पुढे ( प्रति1 किलो) गेला आहे.

यानुसार, 999 शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत आता 223 रुपयांनी वाढून 50,890 रुपयांवर पोहोचली आहे. तर शेवटच्या व्यवहाराच्या दिवसात सोन्याचा भाव 50,667 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. त्याचप्रमाणे 999 शुद्धतेची 1 किलो चांदी 180 रुपयांनी महागली आहे. सोमवारी 1 किलो चांदीचा भाव 65,354 रुपये होता, तर गेल्या आठवड्यातील शेवटच्या व्यवहारात 1 किलो चांदीचा भाव 65,174 रुपये प्रति किलो होता.

लेटेस्ट सोन्याचा दर- 999 शुद्धतेच्या सोन्याची किंमत 50,890 रुपये (प्रति 10 ग्रॅम).- 995 शुद्धतेच्या सोन्याची किंमत 50, 686 रुपये  (प्रति 10 ग्रॅम).- 916 शुद्धतेच्या सोन्याची किंमत 46,615 रुपये (प्रति 10 ग्रॅम).- 750 शुद्धतेच्या सोन्याची किंमत 38,168 रुपये (प्रति 10 ग्रॅम).

टॅग्स :सोनंचांदीव्यवसाययुक्रेन आणि रशिया