Join us
Daily Top 2Weekly Top 5

Gold Silver Price Today: सोनं झालं स्वस्त; चांदी ₹८,३५० नं आपटली, काय आहे किंमत घसरण्यामागचं कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 15:26 IST

Gold Silver Rate Today 13 March 2026: सोन्या आणि चांदीच्या किमतीत आज घसरण पाहायला मिळाली आहे. सराफा बाजारात दोन्ही धातूंच्या किमतीत काल म्हणजेच गुरुवारच्या तुलनेत घट झाली आहे.

Gold Silver Rate Today 13 March 2026: सोन्या आणि चांदीच्या किमतीत आज घसरण पाहायला मिळाली आहे. सराफा बाजारात दोन्ही धातूंच्या किमतीत काल म्हणजेच गुरुवारच्या तुलनेत घट झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर आज १,५८,५५५ रुपये प्रति १० ग्रॅम वर आलाय. काल संध्याकाळी हाच दर १,६०,३०३ रुपये प्रति १० ग्रॅम होता. म्हणजेच काल संध्याकाळपासून आतापर्यंत सोन्याच्या किमतीत १,७४८ रुपयांची घसरण झाली आहे. विशेष म्हणजे काल दुपारी २४ कॅरेट सोन्याचा दर १,५९,६२४ रुपये प्रति १० ग्रॅम या पातळीवर होता.

चांदीचा दर काय आहे?

ibjarates नुसार, चांदीचा दर आज २,५९,९५१ रुपये प्रति किलोपर्यंत खाली आला आहे. काल संध्याकाळी एक किलो चांदीचा दर २,६८,३०१ रुपये होता. आज चांदीच्या किमतीत ८,३५० रुपयांची घट झाली आहे. यापूर्वी काल सकाळी चांदीचा दर २,६३,८०० रुपये प्रति किलो इतका होता.Wife सोबत एकत्र उघडा Post Office मध्ये खातं, दर महिन्याला मिळेल ₹९.२५० चं फिक्स व्याज

आज शुक्रवारी २३ कॅरेट सोन्याचा दर १,५७,९२० रुपये प्रति १० ग्रॅम इतका होता. तर २२ कॅरेट सोन्याची विक्री १,४५,२३६ रुपये प्रति १० ग्रॅम या दराने होत आहे. १८ कॅरेट सोन्याचा दर १,१८,९१६ रुपये प्रति १० ग्रॅम आणि १४ कॅरेट सोन्याचा दर ९२,७५५ रुपये प्रति १० ग्रॅम या पातळीवर होता. या किमतींमध्ये जीएसटी आणि मेकिंग चार्जेसचा समावेश नाही.

सोने स्वस्त का होत आहे?

सोन्याच्या किमतीतील घसरणीमागे डॉलर हे मुख्य कारण मानलं जात आहे. जागतिक अनिश्चिततेच्या काळात डॉलर मजबूत होत आहे, ज्याचा नकारात्मक परिणाम सोन्याच्या किमतीवर दिसून येत आहे. यामुळेच सोन्याचे भाव आज पुन्हा घसरले आहेत. तसंच, लग्नसराईचा हंगाम संपल्यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतीत झालेली घट स्पष्टपणे दिसून येत आहे.

सोन्याच्या किमतीत स्थिरता

९ मार्च रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर १,५९,५६८ रुपये प्रति १० ग्रॅम होता. त्यानंतर १० मार्चला हा दर १,६०,४३६ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला. सध्या सोन्याचा दर १,५८,००० ते १,६०,००० रुपयांच्या रेंजमध्ये व्यवहार करत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Gold Prices Drop, Silver Plummets: Know the Reason Behind the Fall

Web Summary : Gold prices fell sharply, with 24-carat gold decreasing by ₹1,748 per 10 grams. Silver prices also plummeted by ₹8,350 per kg. A stronger dollar and the end of the wedding season are attributed to the price decrease. Prices are fluctuating between ₹1,58,000 to ₹1,60,000.
टॅग्स :सोनंचांदीगुंतवणूक