Join us

Gold Silver Price Today 13 Feb: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा तेजी, आज मोठी वाढ; वर्षभरात १० हजारांनी वाढली किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 13:29 IST

Gold Silver Price Today 13 Feb: एका दिवसाच्या घसरणीनंतर आज पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली. खरेदीपूर्वी पाहा किती आहे आजचा दर.

Gold Silver Price Today 13 Feb: एका दिवसाच्या घसरणीनंतर आज पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली. आज १३ फेब्रुवारी रोजी २४ कॅरेट सोन्याचा भाव ८९९ रुपये प्रति १० ग्रॅमनं वाढून ८५,७४४ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर, चांदी १४३७ रुपयांनी वधारून ९५,६२६ रुपये प्रति किलोवर पोहोचली. या किंमतीत जीएसटीचा समावेश नाही. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (आयबीजेए) हा दर जाहीर केला आहे. कदाचित तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकेल.

वर्षभरात सोन्यात मोठी वाढ

या वर्षी आतापर्यंत सोनं १०,००४ रुपयांनी तर चांदी ९,६०९ रुपयांनी महागली आहे. ३१ डिसेंबर २०२० रोजी सोनं ७५,७४० रुपयांवर बंद झाले होते. चांदीही ८६,०१७ रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली. ३१ जानेवारी २०२५ रोजी सोन्याचा भाव ८२,१६५ रुपये प्रति १० ग्रॅम होता.

आयबीजेएच्या दरानुसार आज २३ कॅरेट सोन्याचा भाव ८७६ रुपयांनी वाढून ८५,४०१ रुपये झालाय. २२ कॅरेट सोन्याचा सरासरी स्पॉट भाव आता ८२४ रुपयांनी वाढून ७८,५४२ रुपये आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव ६७४ रुपयांनी वाढून ६४,३०८ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव आता ५०,१६० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.

फेब्रुवारीतील विक्रमी कामगिरी

  • ४ फेब्रुवारी २०२५ रोजी सोन्यानं ८३,०१० रुपये प्रति १० ग्रॅमचा उच्चांक गाठला होता.
  • ५ फेब्रुवारी २०२५ रोजी सोन्यानं ८४,६५७ रुपये प्रति १० ग्रॅमचा उच्चांक गाठला. 
  • ६ फेब्रुवारी रोजी सोन्यानं ८४,६७२ रुपयांचा उच्चांक गाठला.
  • ७ फेब्रुवारी रोजी सोन्यानं ८४,६९९ रुपयांचा उच्चांक गाठला होता.
  • १० फेब्रुवारीला सोन्यानं ८५,६६५ रुपयांचा नवा उच्चांक गाठला.
  • ११ फेब्रुवारी रोजी सोन्यानं आणखी एक इतिहास रचला आणि ८५,९०३ रुपये प्रति १० ग्रॅमचा नवा उच्चांक गाठला.
टॅग्स :सोनंचांदी