Join us

Gold Silver Price 23 May: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, एकाच दिवसात सोनं ₹१२८९, चांदी ₹३४७६ स्वस्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 13:22 IST

Gold Silver Price 23 May: सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर.

Gold Silver Price 23 May: सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज 23 मे रोजी सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 1289 रुपयांनी घसरून 72791 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर, चांदीत सर्वात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. चांदी 3476 रुपये प्रति किलोनं स्वस्त होऊन 89410 रुपये प्रति किलो दरावर आली. यापूर्वी बुधवारी सोनं 74080 रुपये आणि चांदी 92886 रुपयांवर बंद झाली होती. 19 एप्रिल 2024 रोजी सोनं 73596 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर होतं. मात्र, 22 मे रोजी चांदीनं 93094 रुपये प्रति किलोचा उच्चांकी स्तर गाठला होता. 

आयबीजेएच्या ताज्या दरानुसार, गुरुवारी, 23 मे रोजी 995 शुद्धतेच्या सोन्याचा भाव 1289 रुपयांनी घसरून 72500 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1180 रुपयांनी घसरून 66677 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तर 18 कॅरेट सोन्याचा भाव 128 रुपयांनी कमी होऊन 46,690 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव 754 रुपयांनी कमी होऊन 42583 रुपयांवर आला. 

मिस्ड कॉलद्वारे मिळवू शकता माहिती 

ibja केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या सुट्ट्या वगळता शनिवार आणि रविवारी दर जाहीर करत नाही. 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर तुम्हाला एसएमएसद्वारे दर उपलब्ध होतील. याशिवाय वारंवार होणाऱ्या अपडेट्सच्या माहितीसाठी तुम्ही www.ibja.co किंवा ibjarates.com या संकेतस्थळांना भेट देऊ शकता. या दरांमध्ये जीएसटी आणि मेकिंग चार्जेसचा समावेश नसतो. त्यानुळे तुमच्या शहरात सोन्या-चांदीचे दर निराळे असू शकतात.

टॅग्स :सोनंचांदी