Gold Silver Price Today: सोमवारी सोन्याच्या किमतीत घट पाहायला मिळाली. ऊर्जा साधनांच्या वाढत्या किमती आणि महागाईच्या चिंतेमुळे अमेरिकेत व्याजदरात कपात होण्याची शक्यता कमी होत असल्यानं हा परिणाम दिसून येत आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, आज सोमवारी ९९९ शुद्धतेचं सोनं १,५६,४३६ रुपये प्रति १० ग्रॅम दरानं मिळत आहे. यापूर्वी शुक्रवारी हा दर १,५८,३९९ रुपये होता, म्हणजेच आज सोन्याच्या दरात १,९६३ रुपयांची घट झाली आहे. ९९५ शुद्धतेच्या सोन्याचा विचार केल्यास, आज याचा भाव १,५५,८१० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला असून यामध्ये १,९५५ रुपयांची घसरण झाली. शुक्रवारी याची किंमत १,५७,७६५ रुपये होती.
PNB मध्ये ३०४ दिवसांच्या FD मध्ये ₹३,००,००० जमा करा; किती मिळेल व्याज? पटापट चेक करा कॅलक्युलेशन
विविध शुद्धतेच्या सोन्याचे दर
आज ९१६ शुद्धतेचं (२२ कॅरेट) सोनं १,४३,२९५ रुपये प्रति १० ग्रॅम दराने विकलं जात आहे. शुक्रवारी याचा दर १,४५,०९३ रुपये होता, म्हणजेच यात १,७९८ रुपयांची घट झाली. दरम्यान, bullions.co.in च्या माहितीनुसार, आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात १,९०० रुपयांची मोठी घसरण होऊन ते १,५७,१८० रुपये प्रति १० ग्रॅमवर आलंय.
चांदीचे ताजे दर
IBJA नुसार, आज एक किलो चांदीची किंमत २,५२,७९३ रुपये आहे. गेल्या शुक्रवारी चांदी २,६०,४८८ रुपये प्रति किलो दराने विकली जात होती. म्हणजेच आज चांदीच्या दरात ७,६९५ रुपयांची मोठी घसरण झाली. तर, bullions.co.in नुसार चांदी २,५४,१३० रुपये प्रति किलो दरानं विकली जात असून त्यात ५,५८० रुपयांची घट नोंदवण्यात आली आहे. IBJA दिवसातून दोनदा सोने-चांदीचे दर जाहीर करते.
शहरांनुसार सोन्याचे भाव
भारतात सामान्यतः २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेट शुद्धतेमध्ये सोनं विकलं जातं. २४ कॅरेट सोनं सर्वात शुद्ध मानलं जातं, तर दागिने बनवण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा अधिक वापर होतो. १६ मार्च २०२६ रोजी देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या किमतीत थोडा फरक दिसून आला.
- दिल्ली: २४ कॅरेट सोनं ₹१,५६,७४० प्रति १० ग्रॅम.
- मुंबई: २४ कॅरेट सोनं ₹१,५७,०९० प्रति १० ग्रॅम.
- कोलकाता: २४ कॅरेट सोनं ₹१,५६,८१० प्रति १० ग्रॅम.
- चेन्नई: २४ कॅरेट सोनं ₹१,५७,४७० प्रति १० ग्रॅम.
Web Summary : Gold prices fell due to global economic concerns. Silver prices also saw a significant drop. Check city-wise rates for 24-carat gold.
Web Summary : वैश्विक आर्थिक चिंताओं के कारण सोने की कीमतों में गिरावट आई। चांदी की कीमतों में भी भारी गिरावट आई। 24 कैरेट सोने के लिए शहर-वार दरें जांचें।