Join us
Daily Top 2Weekly Top 5

Gold Rate Today: सोने पुन्हा एकदा झाले महाग, चांदीचे भावही कडाडले, जाणून घ्या आजचे दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2020 11:53 IST

गेल्या महिन्यात 56,200 विक्रमी उच्चांक असलेल्या सोन्याच्या किमतीत प्रति दहा ग्रॅम 5,000 रुपयांची घट झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये तेजी दिसून आली आहे. मागील आठवड्यात जोरदार घसरण झाल्यानंतर सोमवारी सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. एमसीएक्सवर सोन्याचे दर 0.4 टक्क्यांनी वाढून 51,532 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर चांदीच्या भावातही 0.6  टक्क्यांची वाढ होऊन दर 68,350 रुपये प्रतिकिलो राहिला. गेल्या सत्रात गोल्ड फ्यूचरला 1 टक्क्यांनी किंवा 500 रुपयांनी खाली आलं होतं, तर चांदीचा दर 1.5 टक्के किंवा 1,050 रुपये प्रतिकिलो होता. गेल्या महिन्यात 56,200 विक्रमी उच्चांक असलेल्या सोन्याच्या किमतीत प्रति दहा ग्रॅम 5,000 रुपयांची घट झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे..आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भावजागतिक बाजारपेठेत सोन्याचे दर आज फारसे चढ-उतार झालेले नव्हते. स्पॉट सोन्याचे दर प्रति औंस 1,941.11 डॉलर होते. त्याच वेळी इतर मौल्यवान धातू, चांदीचे भाव गडगडले. चांदी 0.3 टक्क्यांनी घसरून 26.68 डॉलर प्रति औंसवर आली. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या आर्थिक धोरणांच्या निर्णयापूर्वी या शनिवार व रविवारच्या आधी सोन्याचे गुंतवणूकदार सावध होते. 15 ते 16 सप्टेंबरला होणा-या अमेरिकन मध्यवर्ती बँकेच्या दोन दिवसीय धोरण बैठकीवर सोन्याचे व्यापारी लक्ष केंद्रित करतील.यावर्षी सोने 30 टक्के अधिक महागलेयावर्षी सोन्याची किंमत पाहिल्यास, अलिकडच्या काळात काही प्रमाणात घसरण झाली असली तरी आतापर्यंत ही सुमारे 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. भविष्यातील बाजाराबद्दल सांगायचे तर सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम सुमारे 51,000 रुपये आहे. गेल्या महिन्यात ते प्रति 10 ग्रॅम 56,000 रुपयांच्या पातळीवर पोहोचले.सुवर्ण बाजारातून कमाईची संधीवर्ष 2013नंतर लोकांना फिजिकल सोन्याशिवाय इतर पर्यायांमध्ये रस दाखवला. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे लोकांकडे फिजिकल सोन्याव्यतिरिक्त पेपर सोन्यात गुंतवणूक करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. एवढेच नव्हे तर सोन्यात गुंतवणूक करून लोकांना सुवर्ण डिलिव्हरीचा पर्यायही मिळत आहे. गुंतवणूकदारांव्यतिरिक्त पेटीएम गोल्ड, सॉवरेन गोल्ड बाँड, गोल्ड ईटीएफ यांसारख्या गुंतवणुकीच्या पर्यायांचा सामान्य लोकही पुरेपूर फायदा घेत आहेत.

टॅग्स :सोनंगोल्ड स्पॉट एक्स्चेंज