Join us
Daily Top 2Weekly Top 5

Gold Rate: मागील ७ महिन्यात सोन्याच्या किंमतीत २५ टक्क्यांनी वाढ; आज गाठला विक्रमी दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 12:40 IST

आंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढल्यानंतर गुरुवारी दिल्ली सराफ बाजारात सोन्याच्या किंमतीत ५०२ रुपयांनी वाढ झाली

नवी दिल्ली – मागील काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत वेगाने वाढत होत आहे. आज सकाळी सोन्याच्या किंमतीने ५० हजार ८७० हा उच्चांक दर गाठला तर ५० हजार ७२५ दर निच्चांक होता. वायदा बाजारात गुरुवारी सोन्याचे दर १० ग्रॅमला ३४८ रुपयांनी वाढून ५० हजार ४१८ इतके झाले होते. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये डिलिव्हरी सोन्याच्या कराराची किंमत ऑगस्टमध्ये ३४० रुपये म्हणजे ०.६८ टक्क्यांनी वाढून ५० हजार ४१८ रुपये प्रति १० ग्रॅम झाली.

बाजार विश्लेषकांनी सांगितले की, व्यापाऱ्यांनी नवीन खरेदी केल्यामुळे सोन्याची किंमत वायदा बाजारात वाढली. न्यूयॉर्कमध्ये सोन्याचे भाव ०.६८ टक्क्यांनी वधारून ते १ हजार ८७७.८० डॉलर प्रति औंस झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढल्यानंतर गुरुवारी दिल्ली सराफ बाजारात सोन्याच्या किंमतीत ५०२ रुपयांनी वाढ झाली. सोन्याच्या किंमतीने १० ग्रॅममागे ५१ हजारांचा टप्पा ओलांडला. मार्केट बंद होण्यापूर्वी सोन्याचे दर ५० हजार ९४१ रुपये प्रति ग्रॅम इतके होते. तर चांदी ६९ रुपयांनी घसरून ६२ हजार ७६० प्रति किलोग्रॅम भाव होता.

एकीकडे बँकांनी छोट्या उद्योगांना कर्ज देण्याचे दरवाजे बंद केले आहेत तर दुसरीकडे सोन्याच्या कर्जाची भरपाई करणाऱ्या कंपन्यांनी अशा कर्जदारांसाठी रेड कार्पेट घातलं आहे. आता बरेच छोटे आणि मध्यम व्यावसायिक मालक त्यांच्या घरात ठेवलेले सोन्याकडे पहात आहेत, जेणेकरून ते सहजपणे कर्ज घेतील. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, दररोज सोन्याच्या कर्जाच्या वापरामध्ये जवळपास ३० ते ३५% वाढ होते. मुथूट फिनकॉर्प आणि मुथूट फायनान्सची मालमत्ता सतत वाढत आहे. मुथूट फिनकॉर्पचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष जॉन मुथूट यांचे म्हणणे आहे की सोन्याच्या वाढत्या किंमती कर्ज घेणार्‍यांना खूप उपयुक्त ठरल्या आहेत आणि त्यांना अधिक कर्ज घेण्यास सक्षम करते.

या वर्षाच्या सुरुवातीस, सोन्याचे दर १० ग्रॅम ३९ हजार रुपये होते, जे आतापर्यंत ४९ हजार ५०० च्या विक्रमी पातळीवर गेले आहेत. फ्युचर्स मार्केटमध्ये सध्या सोने ४९ हजारांच्या पातळीवर आहे. यावर्षी आतापर्यंत सोन्याच्या किंमतीत २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

टॅग्स :सोनं