Join us
Daily Top 2Weekly Top 5

Gold Silver Rate Today: सोन्याच्या किमतीत घसरणीचा कल कायम; पाहा काय आहेत सोन्या-चांदीचे नवे दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 15:56 IST

Gold Silver Rate Today: देशांतर्गत बाजारपेठेत सोन्याच्या किमतीत घसरणीचा कल सुरूच आहे. पाहा काय आहेत सोन्या-चांदीचे नवे दर.

Gold Silver Rate Today: देशांतर्गत बाजारपेठेत सोन्याच्या किमतीत घसरणीचा कल सुरूच आहे. १४ मार्च रोजी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर घसरून १,६०,८३० रुपये प्रति १० ग्रॅम वर आला आहे. तर मुंबईत हा दर १,६०,६८० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. एक दिवसापूर्वी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत २,००० रुपये किंवा १.२१ टक्क्यांची घसरण होऊन तो १,६५,२०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला होता. डॉलरचा वाढता प्रभाव आणि जागतिक चलनविषयक धोरणातील अनिश्चितता ही या घसरणीमागची प्रमुख कारणं असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

जागतिक परिस्थितीचा परिणाम

पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत, ज्यामुळे महागाई वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे मध्यवर्ती बँकांना प्रदीर्घ काळासाठी कडक चलनविषयक धोरण राखावं लागू शकते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हाजिर सोनं सध्या ५,०८८ डॉलर प्रति औंस वर आहे.

Fortuner खरेदी करण्यासाठी किती असायला हवी तुमची सॅलरी? पाहा EMI चा हिशोब

देशातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर

दिल्ली: २४ कॅरेट सोन्याचा दर १,६०,८३० रुपये प्रति १० ग्रॅम, तर २२ कॅरेटचा भाव १,४७,४४० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.

मुंबई, चेन्नई आणि कोलकाता: या शहरांमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत १,४७,२९० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याची किंमत १,६०,६८० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.

पुणे आणि बंगळूरू: या दोन्ही शहरांमध्ये २४ कॅरेट सोनं १,६०,६८० रुपये आणि २२ कॅरेट सोनं १,४७,२९० रुपये प्रति १० ग्रॅम दराने विकलं जात आहे.

चांदीच्या किमतीतही घट

सोन्यासोबतच चांदीही सातत्यानं स्वस्त होत आहे. १४ मार्चच्या सकाळी चांदीचा दर २,७९,८०० रुपये प्रति किलोवर आला आहे. एक दिवसापूर्वी दिल्लीत चांदीची किंमत ११,००० रुपये किंवा ३.९७ टक्क्यांनी घसरून २,६५,५०० रुपये प्रति किलो झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांदीचा हाजिर भाव ८३.१४ डॉलर प्रति औंस आहे. विशेष म्हणजे, या वर्षी जानेवारी महिन्यात चांदीच्या किमतीनं ४ लाख रुपयांचा टप्पा ओलांडला होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Gold prices continue to fall; check latest rates.

Web Summary : Gold prices are declining in the domestic market, influenced by global factors and dollar strength. In Delhi, 24-carat gold is ₹1,60,830 per 10 grams. Silver also fell, now at ₹2,79,800 per kg, after previously hitting ₹4,00,000 in January.
टॅग्स :सोनंचांदी