Gold Price: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ होताना दिसत आहे. दिल्लीतील सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याची किंमत ११०० रुपयांनी वाढून ९२,१५० रुपये प्रति १० ग्राम झाली. अखिल भारतीय सराफा महासंघानं ही माहिती दिली. मागील सत्रात ९९.९ टक्के शुद्धतेचं सोनं ९१,०५० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झालं होतं. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये सोन्याचे दर २३,७३० रुपये होते म्हणजेच त्याची किंमत ३५ टक्क्यांनी वाढली आहे. जे गेल्या वर्षी १ एप्रिल रोजी ६८,४२० रुपये प्रति १० ग्रॅम होती.
सलग तिसऱ्या सत्रात ही तेजी कायम ठेवत ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्यानं ११०० रुपयांची उसळी घेत ९१,७०० रुपये प्रति १० ग्रॅमचा उच्चांक गाठला. मागील सत्रात सोनं ९०,६०० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झालं होतं.
कमाई करायची असेल तर समजून घ्या गणित; ज्वेलरी की Gold ETF, कुठे मिळू शकतो बंपर रिटर्न?
चांदीची चमक वाढली
चांदीचा भाव १,३०० रुपयांनी वधारून १,०३,००० रुपये प्रति किलोच्या विक्रमी पातळीवर बंद झाला. १९ मार्च रोजी चांदीनं १,०३,५०० रुपये प्रति किलोचा विक्रमी उच्चांक गाठला.
काय म्हणतात तज्ज्ञ?
सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत राहिली आणि शुक्रवारी नवा विक्रम प्रस्थापित केला. जागतिक व्यापारयुद्ध वाढल्याने आणि त्याचा आर्थिक विकासावर होणारा परिणाम यामुळे सोन्याला गती मिळाली असल्याची प्रतिक्रिया एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) सौमिल गांधी यांनी दिली. एलकेपी सिक्युरिटीजचे रिसर्च अॅनालिसिसचे उपाध्यक्ष (कमोडिटीज अँड करन्सी) जतिन त्रिवेदी यांनी २ एप्रिलपासून अमेरिकेकून शुल्क लागू झाल्यानंतर व्यापारातील अनिश्चितता आणखी वाढण्याची शक्यता असल्याचं म्हटलं.
जागतिक स्तरावर स्पॉट गोल्डनं ३,०८६.०८ डॉलर प्रति औंसचा विक्रमी उच्चांक गाठला. याशिवाय कॉमेक्स सोन्याचा वायदा भाव ३,१२४.४० डॉलर प्रति औंस वर पोहोचला. कोटक सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, वाढत्या ट्रेड वॉरच्या चिंतेमुळे कॉमेक्स गोल्ड फ्युचर्सने विक्रमी उच्चांक गाठला. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी वाहन आयात शुल्क, तसंच युरोपियन युनियन आणि कॅनडाविरोधात शुल्काचा इशारा दिल्यानं सुरक्षित गुंतवणुकीच्या मागणीला चालना मिळाली आगे.