Join us

सोन्याच्या दरात सलग आठव्या दिवशी वाढ; दिल्लीत ओलांडला सर्वकालिन ८३००० चा टप्पा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 23:26 IST

डोनाल्ड ट्रम्प यांच्या कठोर निर्णयांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात अनिश्चिततेचे वातावरण आहे. यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे लोकांचा ओढा वाढला आहे.

दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा दर सलग आठव्या दिवशी वाढला आहे. आज सोने २०० रुपयांनी महाग झाले आहे. दिल्लीत सोन्याचा दर ८३ हजार रुपये प्रति तोळावर पोहोचला आहे. जागतिक बाजारातील अनिश्चिततेमुळे सोन्याच्या मागणी वाढली आहे. याचा परिणाम सोन्याच्या किंमती वाढण्यात झाला आहे. 

जागतिका बाजारात जोरदार विक्री सुरु झाली आहे. यामुळे गुंतवणूक दारांनी सोन्याला मोठी पसंती दिली. सलग आठव्या सत्रात सोन्याचा दर वाढला आहे. दिल्लीत पहिल्यांदाच सोन्याचा दर ८३ हजाराला टच झाला आहे. गुरुवारी सोन्याचा दर ८२,९०० रुपये होते. ते आता ८३,१०० रुपये झाले आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांच्या कठोर निर्णयांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात अनिश्चिततेचे वातावरण आहे. यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे लोकांचा ओढा वाढला आहे. चांदीचा दर देखील ५०० रुपयांनी वाढून ९४ हजार रुपये प्रति किलोवर गेला आहे. गेल्या सत्रात चांदी ९३ हजार ५०० रुपयांवर बंद झाली होती. 

मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा दर 82,550.00 रुपयांवर आला आहे. महिन्याभरात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. २४ डिसेंबरला ७७,९४५ वर असणारा दर आज 4,235 रुपयांनी वाढला आहे. 

टॅग्स :सोनं