गेल्या महिनाभरात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण दिसून आली आहे. ५ मार्च ते ५ एप्रिल २०२६ या कालावधीत सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम तब्बल २६२९३ रुपयांची घट झाली आहे. जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धामुळे निर्माण झालेली अस्थिर परिस्थिती हे या घसरणीचे मुख्य कारण मानले जात आहे.
गेल्या ५ मार्च २०२६ रोजी सोन्याचा भाव १६०५८६ रुपये प्रति १० ग्रॅम एवढा होता. जो २ एप्रिलपर्यंत १४६६०८ रुपयांवर आला. चांदीच्या दरातही अशीच अस्थिरता दिसत आहे. चांदी ५ मार्च रोजी २६४२१२ रुपये प्रति किलो होती. ती आता २२७८१३ रुपयांपर्यंत खाली आली आहे. अर्थात चांदीच्या दरात ३६३९३ एवढी घसरण झाली आहे.
असे आहेत आजचे दर -शुक्रवार, शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांमुळे नवीन दर जाहीर करण्यात आलेले नाहीत. यामुळे, २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १४५५०७ रुपये होता. २३ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १४४९२४ रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १३३२८२ रुपये आहे. त्याचबरोबर, १८ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १०९१३० रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८५१२२ रुपये आहे. चांदीसंदर्भात बोलायचे झाल्यास, चांदी प्रति किलोग्रॅम २२४६६० रुपयांपर्यंत खाली आली आहे.
घसरणीला युद्धाची स्थिती जबाबदार -सोन्याच्या किमतीतील घसरणीला प्रामुख्याने युद्धाची स्थिती जबाबदार आहे. युद्धामुळे कच्च्या तेलाची पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव १०० डॉलरच्या पार गेले आहेत. यामुळे महागाई वाढण्याची शक्यता असून मध्यवर्ती बँका व्याजदरात वाढ करू शकतात. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार सोन्याऐवजी डॉलरकडे वळत असल्याने सोन्याच्या मागणीवर परिणाम झाला असून दरात मोठी घसरण बघायला मिळते आहे.
Web Summary : Gold prices drastically fell by ₹26,293 per 10 grams in a month, with silver down ₹36,393 per kg. Global war-induced instability drives investors to the dollar, impacting gold demand. Current gold (24K) rate: ₹145507 per 10 grams; silver: ₹224660 per kg.
Web Summary : सोने की कीमतों में एक महीने में ₹26,293 प्रति 10 ग्राम की भारी गिरावट आई, जबकि चांदी में ₹36,393 प्रति किलो की गिरावट आई। वैश्विक युद्ध के कारण अस्थिरता निवेशकों को डॉलर की ओर ले जा रही है, जिससे सोने की मांग प्रभावित हो रही है। वर्तमान सोने (24K) की दर: ₹145507 प्रति 10 ग्राम; चांदी: ₹224660 प्रति किलो।