Join us

Gold Price Today:सोने झाले महाग, चांदी झाली स्वस्त; पाहा आजचे दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 13:21 IST

गेल्या काही दिवसापासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या, चांदीच्या किंमतीत चढ-उतार होत असल्याचे दिसत आहे. आज चांदीच्या दरात घसरणा झाली आहे तर सोन्याच्याच्या दरात वाढ झाली आहे.

आज सोन्याचे दर वाढले आहेत तर चांदीच्या दरात घट झाली आहे.  आज 24 कॅरेट सोने 62226 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​उघडले. तर चांदीच्या दरात किलोमागे 260 रुपयांची घट झाली आहे. आज चांदी गोरखपूर, दिल्ली, मुंबई, लखनौ, जयपूर, इंदूर, कोलकाता, जयपूर आणि पाटणासह सर्व शहरांमध्ये सरासरी 70950 रुपये प्रति किलो दराने उघडली.

सोने 4 डिसेंबर 2023 रोजीच्या 63805 रुपयांच्या सार्वकालिक उच्चांकावरून 1579 रुपयांनी स्वस्त झाले आहे. आज, बुधवार, 21 फेब्रुवारी रोजी सराफा बाजारात 23 कॅरेट सोन्याची सरासरी किंमत आता 87 रुपयांनी वाढून 61977 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव आता प्रति 10 ग्रॅम 80 रुपयांनी वाढून 56999 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

Byju's च्या फाऊंडरनाच हटवण्यासाठी गुंतवणूकदारांच्या समूहानं बोलावली बैठक, काय लावले आरोप

आज 18 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅममागे 66 रुपयांनी वाढला आहे. आता तो 46670 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला आहे. तर 14 कॅरेट सोन्याच्या दरात 10 ग्रॅममागे 51 रुपयांनी वाढ झाली आहे. आज ते 36402 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने उघडले.

सोन्या-चांदीचे हे दर इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने जारी केले आहेत. तुमच्या शहरात सोने-चांदी 1000 ते 2000 रुपयांनी महागण्याची शक्यता आहे.

 IBJA या वेबसाइटवर दिलेल्या दरांमध्ये जीएसटीचा समावेश नाही. सोने खरेदी आणि विक्री करताना तुम्ही IBJA दरांचा संदर्भ घेऊ शकता. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन वर दिलेल्या आहवालानुसार, इब्जा देशभरातील 14 केंद्रांमधून सोन्या-चांदीचे सध्याचे दर घेते आणि त्याचे सरासरी मूल्य देते.या वेबसाइटवर दिलेल्या दरांमध्ये जीएसटीचा समावेश नाही. सोने खरेदी आणि विक्री करताना तुम्ही IBJA दरांचा संदर्भ घेऊ शकता. 

टॅग्स :सोनंचांदी