Gold Price Review: सोन्या-चांदीच्या दरात सोमवारी मोठी वाढ झाली. एका दिवसात सोन्या-चांदीच्या दरात १३०० रुपयांनी वाढ होऊन ती विक्रमी पातळीवर पोहोचली. दिल्लीत सोमवारी सोन्याचा भाव ९०,७५० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा भाव १,०२,५०० रुपये प्रति किलोने वधारला. या वर्षी आतापर्यंत सोन्यानं तेजीचा कल कायम ठेवला आहे. १ जानेवारी रोजी सोन्याचा भाव ७९,३९० रुपये प्रति १० ग्रॅम वरून ११,३६० रुपये किंवा १४.३१ टक्क्यांनी वधारून ९०,७५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला.
सलग चौथ्या दिवशी तेजी
ऑल इंडिया सराफा असोसिएशननं दिलेल्या माहितीनुसार, सलग चौथ्या दिवशी ९९.९ टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या किंमतीत वाढ झाली. सोमवारी त्याचा भाव १,३०० रुपयांनी वधारून ९०,७५० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचलं. चांदीचा भावही १,३०० रुपयांनी वधारून १,०२,५०० रुपये प्रति किलोच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. गुरुवारी चांदीचा भाव १,०१,२०० रुपये प्रति किलो ग्रॅम वर बंद झाला होता. तज्ज्ञांच्या मते, मध्यवर्ती बँकांची खरेदी आणि जागतिक आर्थिक अस्थिरतेसह मौल्यवान धातूंच्या विक्रमी तेजीसाठी अनेक घटक कारणीभूत आहेत.
चांदीनं गाठला नवा उच्चांक
ऑल इंडिया सराफा असोसिएशननं दिलेल्या माहितीनुसार, सलग चौथ्या दिवशी ९९.९ टक्के शुद्धतेच्या सोन्याची किंमत वधारली. सोमवारी सोन्याचा भाव १,३०० रुपयांनी वधारून ९०,७५० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला. चांदीचा भावही १,३०० रुपयांनी वधारून १,०२,५०० रुपये प्रति किलोच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. गुरुवारी चांदीचा भाव १,०१,२०० रुपये प्रति किलो ग्रॅम वर बंद झाला होता
तेजीची कारणं काय?
तज्ज्ञांच्या मते, मध्यवर्ती बँकांची खरेदी आणि जागतिक आर्थिक अस्थिरतेसह मौल्यवान धातूंच्या विक्रमी तेजीसाठी अनेक घटक कारणीभूत आहेत. याशिवाय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार आणि आर्थिक धोरणांमुळे सुरक्षित गुंतवणूक समजल्या जाणाऱ्या मालमत्तेची मागणी वाढली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थिती काय?
आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचा भाव १४.४८ डॉलरनं वाढून २,९९८.९० डॉलर प्रति औंस झाला. शुक्रवारी सोन्यानं प्रति औंस ३,००० डॉलरची पातळी ओलांडली. कॉमेक्स सोन्याचा वायदा भाव ३,००७ डॉलर प्रति औंस होता. शुक्रवारी सोन्यानं ३,०१७.१० डॉलर प्रति औंसचा विक्रमी उच्चांक गाठला.