Join us  

Gold Price: एक दिवस घटले, सोने आज पुन्हा वाढले; लगेचच जाणून घ्या लेटेस्ट दर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2020 11:03 AM

Gold Rates Today: कोरोना काळात पुढे ढकलावी लागलेली लग्नसराई, दिवाळी आदीमुळे सध्या सोन्याच्या खरेदीत वाढ दिसत आहे. परंतू सोन्याच्या दरात मोठा चढउतार पहायला मिळत आहे. शेजारच्याला ४८००० हजाराने मिळालेले सोने दुसऱ्या दिवशी जाताच ४९००० वर गेलेले दिसत आहे.

सोमवारी सराफी बाजारात सोन्याच्या किंमती घसरल्यानंतर (Bullion market fall) आज पुन्हा सोन्याचे दर वाढले आहेत.  मंगळवारी सकाळी फेब्रुवारीच्या डिलिव्हरीचे सोने (Gold delivery rate) 119  रुपयांनी वाढत 50065 रुपये प्रति दहा ग्रॅमवर उघडली. सोमवारी हे सोने 49946 च्या स्तरावर बंद झाले होते. सकाळी 9.50 वाजता 198 रुपयांच्या वाढीने तर 10.40 वाजता 161.00 रुपयांच्या वाढीने व्यवहार सुरु होते. आतापर्यंत 855 लॉटचा व्यवहार झाला आहे.

एप्रिलच्या डिलिव्हरीच्या सोन्यामध्येही आज सकाळी 106 रुपयांची वाढ झाली. एमसीएक्सवर सकाळी 9.50 वाजता ते 250 रुपयांच्या वाढीने 50264 च्या स्तरावर ट्रेड करत होते. यामध्ये 2 लॉटचा व्यवहार झाला आहे. 

सोन्याच्या दरात वाढ झालेली असली तरीही चांदीच्या दरात घट झालेली दिसून आलेली आहे. MCX वर चांदी 65388 रुपयांच्या स्तरावर सुरु झाली. सोमवारी ही चांदी 65499 च्या स्तरावर बंद झाली होती. सध्या चांदीच्या दरात ४३ रुपयांची घट दिसत आहे. सध्या चांदीचे 1188 लॉटमध्ये व्यवहार झाले आहेत. 

Gold Rates: आठवड्याभरात सोने कितीने महागले? जाणून घ्या ताजा दर

सोन्याच्या दरात चढ-उतारकोरोना काळात पुढे ढकलावी लागलेली लग्नसराई, दिवाळी आदीमुळे सध्या सोन्याच्या खरेदीत वाढ दिसत आहे. परंतू सोन्याच्या दरात मोठा चढउतार पहायला मिळत आहे. शेजारच्याला ४८००० हजाराने मिळालेले सोने दुसऱ्या दिवशी जाताच ४९००० वर गेलेले दिसत आहे. सोन्याच्या किंमतीत (price of gold) गेल्या शुक्रवारीही घसरण नोंदविली गेली. मात्र, गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्याचा विचार केला तर सोन्याचे दर वाढलेलेच दिसतील. एमसीएक्सवर फेब्रुवारीला देय असलेल्या सोन्याच्या किंमतीत ९३ रुपयांची घट झाली. शुक्रवारी बाजार बंद होताना सोन्याचा दर हा ४९२०९ रुपये प्रति १० ग्रॅम होता. असे असले तरीही आठवडाभरात सोन्याच्या दरात १२०० रुपयांची वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याची स्थिती अशीच दिसून आली.

सोन्याचे दर ४२००० वर येण्याची शक्यताजाणकारांनुसार डॉलरच्या दरात घसरण झाल्याने या आठवड्यात सोन्याचे दर वाढले आहेत. अमेरिकेत स्टिम्युलस पॅकेज जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील काळात बाजारात सोन्याचे दर हे ४८००० ते ५०००० च्या आत राहण्याची शक्यता आहे. ऑगस्टमध्ये सोन्याच्या दराने ५६३०० रुपयांचा पल्ला गाठला होता. मात्र, आतापर्यंत त्यात ७००० रुपयांची घट झाली आहे. शुक्रवारी आरबीआयने आर्थिक वर्षात जीडीपीचा अंदाज वर्तविल्याने सोन्य़ावर दबाव वाढला होता. महागाई वाढल्याने आरबीआयने रेपो दरात कोणतीही वाढ केली नाही. भारत आपल्य़ा गरजेचे सोने हे आयातच करतो. यातच डॉलरच्या तुलनेत रुपया १३ पैशांनी वधारल्याने ७३.८० च्या स्तरावर गेला होता. नोव्हेंबरमध्ये सोने २६०० रुपयांहून स्वस्त झाले आहे. तर उच्चतम स्तरावरून सोने ४००० रुपयांनी स्वस्त झाले आहे. 

टॅग्स :सोनंगोल्ड स्पॉट एक्स्चेंजचांदी