Gold Silver Price Today 28 March: लग्नसराईच्या हंगामापूर्वी आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सराफा बाजारात जीएसटीशिवाय २४ कॅरेट सोन्याचा भाव ८८९ रुपयांनी वाढून ८९३०६ रुपये झाला. हा त्याचा नवा उच्चांक आहे. तर चांदीच्या दरात ११५९ रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. तर चांदी १००९३४ रुपयांवर खुली झाली. २० मार्च रोजी पहिल्यांदा सोन्याचा भाव ८८,७६१ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला होता. आज आठव्या दिवशी हा विक्रम मोडला गेला. तर १८ मार्च रोजी चांदीनं १००४०० रुपये प्रति किलोचा उच्चांक गाठला होता. आज त्यानंही विक्रमी ओपनिंग केली.
या दरामध्ये जीएसटीचा समावेश नाही. सोन्याच्या किंमतीत जर तुम्ही ३ टक्के जीएसटी जोजला तर आजचा सोन्याचा भाव ९१,९८५ रुपये प्रति १० ग्राम असेल. तर चांदीचा दर १०२७६८ रुपये असेल.
एमसीएक्सवर सोनं वधारलं
जागतिक बाजारात सोन्याचा भाव ०.७ टक्क्यांनी वाढून ३,०७७ रुपये प्रति औंस झाला, तर एमसीएक्स गोल्ड एप्रिल कॉन्ट्रॅक्ट ०.६५ टक्क्यांनी वाढून ८८,९५५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर चांदीचा भाव ०.४८ टक्क्यांनी वधारून १०१७९८ रुपये प्रति किलो झाला आहे.
नव्या आर्थिक वर्षात सोनं महागणार
तज्ज्ञांच्या मते नव्या आर्थिक वर्षात सोनं आणखी महागणार असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली. भूराजकीय तणाव, महागाई आणि फेडच्या व्याजदरात कपातीचा फायदा सोन्याला होणार आहे. गुंतवणूकदारांना डॉलर आणि बाजाराच्या मूडवर लक्ष ठेवावं लागेल. जोखीम असू शकते, परंतु सुरक्षिततेसाठी सोनं हा 'सुवर्ण पर्याय' असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
अमेरिका आणि इतर देशांमधील व्यापारयुद्धाची भीती, वाहन आयातीवर २५ टक्के शुल्क लावण्याची ट्रम्प यांची घोषणा आणि युरोप आणि कॅनडावर कडक कारवाई करण्याची धमकी यामुळे सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. जागतिक बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली असून, त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही होत आहे.
वाढीची कारणं काय?
१. भूराजकीय तणाव (चीन-अमेरिका यांच्यातील तणाव, युक्रेन युद्ध असे मुद्दे)२. फेडच्या व्याजदरात कपातीची अपेक्षा (व्याजदर कमी असल्यास सोन्याची चमक वाढेल)३. मध्यवर्ती बँका सोने खरेदी करत आहेत (आरबीआयने आर्थिक वर्ष २०२५ मध्येच ३२ टन सोनं खरेदी केलंय).
सोनं कधी स्वस्त होणार?
डॉलर मजबूत झाला तर सोन्याची चमक कमी होऊ शकते. गुंतवणूकदारांनी शेअर बाजार किंवा क्रिप्टोकडे धाव घेतल्यास दबावही येऊ शकतो.