अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून (Fed) पुढील महिन्यात व्याजदरांध्ये कपात होण्याची शक्यता कमी झाल्याने आणि जागतिक पातळीवरील किंमत घसरल्याने, मंगळवारी राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या दरात मठी घसरण दिसून आली. आता सोने 3900 रुपयांनी स्वस्त होऊन 125800 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले आहे.
चांदी ₹७,८०० रुपयांनी घसरून ₹१५६००० प्रति किलोवर -अखिल भारतीय सराफा संघाने दिलेल्या माहितीनुसार, २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा दर ₹३९०० ने कमी होऊन साधारणपणे ₹१,२५,८०० (सर्व करांसह) १० ग्रॅमवर आला आहे. सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरावरही मोठा दबाव दिसला आणि चांदी ₹७,८०० रुपयांनी घसरून ₹१५६००० प्रति किलोवर आली आहे.
अमेरिकन व्याजदर कपातीची शक्यता कमी असल्याने घसरण -ऑग्मोंटच्या संशोधन प्रमुख रेनिशा चैनानी यांनी म्हटले आहे की, अमेरिकेतील व्याजदर कपातीची शक्यता कमी झाल्याने, गुंतवणूकदार सावध झाले आहेत. तसेच, गेल्या सहा आठवड्यांतील अमेरिकन आकड्यांची अनुपस्थिती आणि फेडरल रिझर्व्हच्या अनेक अधिकाऱ्यांनी केलेली आक्रमक विदाने, यामुळे डिसेंबरमध्ये व्याज दरांतील कपातीची शक्यता कमी झाली आहे.
परदेशातील बाजारातही सोन्याचे दर घसरले -परदेशी बाजारात, स्पॉट गोल्डमध्ये सलग चौथ्या सत्रात घसरण दिसून आली आणि सोने किरकोळ तोट्यासह $४,०४२.३२ प्रति औंसवर आले. गेल्या चार सत्रांमध्ये, सोन्याचा भाव, १२ नोव्हेंबरच्या $४,१९५.१४ प्रति औंस वरून $१५२.८२ किंवा ३.६४ टक्क्यांनी घसरला आहे.