Indian Woman Gold story: गेल्या काही दिवसांत भारतात सोन्याचे भाव प्रचंड उसळले आहेत. वर्षभरापूर्वी लाखांच्या आत असलेले सोनं यंदा सव्वा लाखांच्याही पुढे गेलं आहे. पण, त्यामुळे भारतीयांची सोन्याची खरेदी थांबलेली नाही. भारतीयांना सोन्याबद्दल प्रचंड आकर्षण असून, त्यामुळे भारतीय महिला सातत्याने सोनं खरेदी करत आल्या आहेत. त्यामुळेच आज स्थितीत भारतातील महिलांकडे जितके सोने आहे, तितके अमेरिकेसह पाच देशांकडेही नाहीये. भारतातील महिलांकडे असलेले एकूण सोने सध्या २४००० टनांवर गेले आहे. (Indian Women Have 24000 Ton Gold More than 5 Countries Includiing America)
गुंतवणुकीचा चांगला मार्ग म्हणून भारतीय महिलांचा कल सोने खरेदीकडेच राहिला आहे. गेल्या काही वर्षात हा कल सोन्याचे दागिने खरेदी करण्याऐवजी नाणी खरेदी करण्याकडे वाढला आहे. सोन्याचे दर वाढत असल्यामुळे भारतीय महिलांनी खरेदी केलेल्या सोन्याचा नफा वाढला आहे.
भारतीय महिला स्मार्ट गुंतवणूकदार
एनडीटीव्ही वर्ल्ड समिटमध्ये बोलताना जागतिक सोने परिषदेचे प्रादेशिक सीईओ सचिन जैन यांनी सांगितले की, भारतीय गृहिणी या गुंतवणुकीच्या बाबतीत स्मार्ट गुंतवणूकदार आहेत. त्यांच्यासारखा स्मार्ट गुंतवणूकदार जगात कुठेही नाही. त्या थोडं थोडं का होईना पण सोन्यामध्ये गुंतवणूक करत राहतात आणि आकडेही तसेच आहे.
भारतीय महिलांकडे २४००० टन सोने, अमेरिकेलाही टाकलं मागे
जागतिक सोने परिषदेच्या रिपोर्टनुसार, भारतीय महिला तब्बल २४,००० टन सोन्याच्या मालक आहेत. जगातील एकूण सोन्याच्या साठ्यापैकी ११ टक्के सोने हे भारतीय महिलांकडे आहे.
हा हिस्सा इतका मोठा आहे की, अमेरिका, जर्मनी, इटली, फ्रान्स आणि रशिया यांच्या केंद्रीय रिझर्व्हमध्ये जितके सोने आहे, त्यापेक्षा जास्त आहे. अमेरिकेकडे ८,१३३.४६ टन सोने आहे, तर जर्मनीकडे ३,३५०.२५ टन. इटलीकडे २,४५१.८४ टन सोने असून, फ्रान्सकडे २,४३७ टन आणि रशियाकडे २,३२९.६३ सोन्याचा साठा आहे. भारतीय महिलांकडे २४,००० टन सोने आहे.
Web Summary : Despite rising gold prices, Indian women continue buying. Their gold holdings, at 24,000 tons, exceed the reserves of America, Germany, Italy, France, and Russia combined. They are smart investors, says World Gold Council.
Web Summary : सोने की बढ़ती कीमतों के बावजूद, भारतीय महिलाओं की खरीदारी जारी है। उनके पास 24,000 टन सोना है, जो अमेरिका, जर्मनी, इटली, फ्रांस और रूस के भंडार से अधिक है। वर्ल्ड गोल्ड काउंसिल के अनुसार, वे स्मार्ट निवेशक हैं।