Join us

कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त Gold Loan?, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 16:03 IST

gold loan rates : अनेक बँका आहेत, ज्या तुम्हाला घरात ठेवलेल्या सोन्यावर कर्ज देऊ शकतात.

नवी दिल्ली : गोल्ड लोनबद्दल (Gold Loan) तुम्ही ऐकलेच असेल. जर तुम्हाला अचानक पैशांची गरज भासली तर घरात ठेवलेले सोने तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. गोल्ड लोनद्वारे तुम्ही घरात ठेवलेल्या सोन्यावर कर्ज घेऊ शकता. देशात अनेक गोल्ड लोन कंपन्या आहेत, ज्या तुम्हाला घरात ठेवलेल्या सोन्यावर कर्ज देऊ शकतात. याशिवाय अशा अनेक बँका आहेत, ज्या तुम्हाला घरात ठेवलेल्या सोन्यावर कर्ज देऊ शकतात. येथे आम्ही तुम्हाला त्यांच्या व्याजदरांची माहिती देत ​​आहोत.

या बँका स्वस्तात गोल्ड लोन देतायेत...- फेडरल बँक (Federal Bank) आपल्या ग्राहकांना 6.99 टक्के व्याजदराने सर्वात स्वस्त  गोल्ड लोन देत आहे.- देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक एसबीआय (SBI) 7 टक्के व्याजाने  गोल्ड लोन देत आहे.- पंजाब अँड सिंध बँक (Punjab & Sind Bank) देखील 7 टक्के व्याजदराने गोल्ड लोन देत आहे.- पंजाब नॅशनल बँक (PNB) 7.25 टक्के व्याजाने गोल्ड लोन सुविधा देत आहे.- कॅनरा बँकेत (Canara Bank)  7.35 टक्के दराने गोल्ड लोन उपलब्ध आहे.- इंडियन बँक (Indian Bank) आपल्या ग्राहकांना 8 टक्के दराने गोल्ड लोन देत आहे.- बँक ऑफ इंडिया (BOI) 8.40 टक्के दराने गोल्ड लोन सुविधा देत आहे.- कर्नाटक बँकेकडून (Karnataka Bank) तुम्ही  8.49 टक्के दराने गोल्ड लोन घेऊ शकता.- युको बँकेत (Uco Bank) 8.50 टक्के दराने गोल्ड लोन उपलब्ध आहे.- तुम्ही एचडीएफसी बँकेकडून (HDFC Bank) 8.50 टक्के व्याजदराने गोल्ड लोन घेऊ शकता.

दरम्यान, गहाण ठेवलेल्या सोन्याच्या मूल्याच्या 75 टक्क्यांपर्यंत  फंड गोल्ड लोन म्हणून घेऊ शकतात आणि सोन्याचा व्याजदर तुमच्या सोन्याच्या शुद्धतेवर आणि इतर निकषांच्या पूर्ततेवर अवलंबून असतो.

टॅग्स :सोनंबँक