Join us

सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 06:03 IST

गोल्ड ईटीएफमधील गुंतवणूक सप्टेंबरमध्ये ६ पट वाढली; ऑगस्टच्या तुलनेत दुप्पट ओतला पैसा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सोन्याचे दर झपाट्याने वाढत असून अजून उंचावण्याच्या अपेक्षेने गुंतवणूकदारांनी सोन्याकडे धाव घेतली आहे. दागिन्यांसोबतच आता मोठ्या प्रमाणावर पैसा ‘गोल्ड ईटीएफ’मध्ये वळत आहे. सप्टेंबर महिन्यात या डिजिटल सोन्यात विक्रमी गुंतवणूक झाली असून गुंतवणूकदारांचा कल स्पष्टपणे बदलताना दिसतो आहे.

गुंतवणूकदारांनी फक्त दागदागिने नव्हे तर गोल्ड एक्सचेंज ट्रेडेडमध्येही  फंड्स (ईटीएफ) ऐतिहासिक रस दाखवला आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये या फंडांमध्ये तब्बल ८,३६३ कोटी रुपयांची निव्वळ आवक झाली. मागील वर्षीच्या सप्टेंबरमधील १,२३२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या तुलनेत यंदा त्यात तब्बल सहापट वाढ झाल्याचे दिसते. अशीच वाढ प्रत्यक्ष सोने खरेदीतही झाल्याचे दिसून येत आहे.

सोन्याची किंमत सर्वोच्च शिखरावरसध्या देशांतर्गत सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम १.२७ लाखांच्या वर गेले आहेत. रोज नवे उच्चांक सोने गाठत आहे. युरोप व मध्यपूर्वेतील भू-राजकीय तणाव, जगभरातील मध्यवर्ती बँकांची मोठ्या प्रमाणातील सोन्याची खरेदी, तसेच अमेरिकेत व्याजदर कपातीच्या अपेक्षा अशा विविध कारणांनी सोन्याचे भाव सातत्याने वाढत आहेत. 

गोल्ड ईटीएफमधून रिटर्न

एका वर्षात         ५०.९७% तीन वर्षांत        ३०.३६%पाच वर्षांत         १६.९३% 

फंड        परतावा (%)एलआयसी म्युच्युअल फंड गोल्ड ईटीएफ        १७.२३क्वांटम गोल्ड फंड – ग्रोथ    १७.०९इन्व्हेस्को इंडिया गोल्ड ईटीएफ    १७.००ॲक्सिस गोल्ड ईटीएफ        १६.९७आयसीआयसीआय प्रुडेन्शियल गोल्ड ईटीएफ        १६.९५

२२ गोल्ड ईटीएफ सध्या भारतात उपलब्ध आहेत. केवळ २०२५ मध्येच चार नवीन फंड्स सुरू झाले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Gold prices soar; investors rush in expecting further gains.

Web Summary : Gold prices are rapidly increasing, attracting investors seeking higher returns. Investment in Gold ETFs has surged, reaching record levels in September. Investors are showing increasing interest in gold beyond traditional jewelry, with substantial inflows into gold exchange-traded funds.
टॅग्स :सोनं