Join us

Gold Hallmarking: साेन्याचे दागिने घेताना नजर तीक्ष्ण ठेवा; आजपासून हाॅलमार्किंग बंधनकारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 07:21 IST

gold hallmarking Mandatory प्रमाणित सुवर्ण विक्रीसाठी महत्त्वाचे पाऊल; हाॅलमार्किंगला काेराेना महामारीमुळे मुदतवाढ देण्यात आली हाेती. त्यानंतर आता मंगळवारपासून नव्या नियमांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सुवर्ण आभूषणे, दागिने व इतर उत्पादनांवर ‘हाॅलमार्किंग’ बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार देशभरातील ज्वेलर्स आता केवळ १४, १८ आणि २२ कॅरेट साेन्याच्या वस्तू विकू शकतील.

हाॅलमार्किंगला काेराेना महामारीमुळे मुदतवाढ देण्यात आली हाेती. त्यानंतर आता मंगळवारपासून नव्या नियमांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये हाॅलमार्किंग केंद्रांची संख्या २५ टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे दरवर्षी १४ काेटी आभूषणांचे हाॅलमार्किंग करण्याची क्षमता निर्माण झाली आहे.

दोन वर्षांपूर्वीचा निर्णयकेंद्र सरकारने नाेव्हेंबर २०१९मध्ये सुवर्ण आभूषणांवर हाॅलमार्किंग बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला हाेता. याची अंमलबजावणी १५ जानेवारी २०२१पासून हाेणार हाेती. मात्र, काेराेनामुळे त्यास मुदतवाढ देण्यात आली हाेती.

हाॅलमार्किंगद्वारे साेन्याची शुद्धता प्रमाणित करण्यात येते.n नव्या नियमांचे भंग केल्यास सराफांना आर्थिक दंड किंवा तुरुंगवासाची शिक्षा हाेऊ शकते.n नाेंदणी प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे.

टॅग्स :सोनं